Marathi News> मनोरंजन
Advertisement

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मेकअप आर्टिस्टचं प्रदीर्घ आजारानंतर निधन; 'उरी', 'संजू'मध्ये विशेष योगदान

Famous Makeup Artist Death : लोकप्रिय आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मेकअप आर्टिस्टचं प्रदीर्घ आजारानंतर निधन

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मेकअप आर्टिस्टचं प्रदीर्घ आजारानंतर निधन; 'उरी', 'संजू'मध्ये विशेष योगदान

Famous Makeup Artist Death : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे निधन झालं आहे. मुंबईच्या पवईमधील हिरानंदानी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. विक्रम गायकवाड यांनी अनेक कलाकारांच्या भूमिका या पडद्यावर जिवंत केल्या आहेत.  विक्रम गायकवाड यांनी मुंबई आज 10 मे रोजी अखेरचा श्वास घेतला. तर दुपारी 4.30 च्या सुमाराद दादरच्या शिवाजी पार्क स्मशानात त्यांच्या पार्थीवावर अंत्यविधी होणार आहेत.  

विक्रम यांना कोरोनामध्ये अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हा पासून ते आजारी होते. परंतु गेल्या आठ दिवसांपासून त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यामुळे त्यांच्यावर पवईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु आज 10 मे रोजी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

विक्रम गायकवाड यांनी काशीनाथ घाणेकर', 'बालगंधर्व', 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान', 'शहीद भगतसिंग'पासून 'जाणता राजा'पर्यंत विविध भूमिकांना त्यांच्या मेकअपच्या स्किल्सनं जिवंत केलं. याशिवाय त्यांनी 'पानिपत', 'बेल बॉटम' ,'उरी', 'डर्टी ब्लॅकमेल' , 'दंगल' , 'पीके', 'झांशी', 'सुपर 30', 'केदारनाथ', 'संजू', 'कपिल देव' अशा अनेक सिनेमात त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी निभावली 

याशिवाय त्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज' या ऐतिहासिक मालिकेत रंगभूषाकार म्हणून जबाबदारी पार पाडली होती. 'पावनखिंड' , 'फत्ते शिकस्त', 'शेर शिवराज' अशा ऐतिहासिक मालिकांमध्ये देखील त्यांनी रंगभूषाकार म्हणून उत्तम जबाबदारी निभावली होती. तर त्यांच्या या उत्तम कामगिरीसाठी विक्रम गायकवाड यांना सात वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

हेही वाचा : एक नोटिस येताच लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी घरातून बेदखल; अनेक धक्कादायक खुलासे, कोण आहे हा सेलिब्रिटी?

करिअरची सुरुवात 

विक्रम गायकवाड यांच्याविषयी बोलायचं झालं तर अभिनेते अशोक शिंदे यांचे वडील बबनराव शिंदे हे त्यांचे गुरु होते. शाळेतल्या मुलांच्या मेकअपसाठी ते विक्रम यांना घेऊन जायचे. त्यावेळी विक्रम हे सातवीत होते. त्यांनी सांगितलं की मुलांचे चिमण्या, गाढव, मोर, पोपट असा मेकअप करु लागले. तर पुण्यातील सगळ्या मुलींच्या शाळेत ते मेकअपसाठी जायचे. दहावीत असताना सगळ्या संगीत नाटकातील दिग्गज कलाकारांचे मेकअप करायचे. 

Read More