Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर बड्या व्यक्तीला फसवणूकीचा आरोप

सयाजी शिंदे यांच्यावर फसवणूकीचा गंभीर आरोप लावला आहे. त्यामुळे हे प्रकरण येणाऱ्या काळात कोणतं  वळण घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर बड्या व्यक्तीला फसवणूकीचा आरोप

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांचं निसर्गावर असलेलं प्रेम ते नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतात. पडद्यावर खलनायक आणि खऱ्या आयुष्यात हिरो अशी उपमाही त्यांना दिली जाते. नेहमी चर्चेत असणारे सयाजी शिंदे यावेळी मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर चित्रपट निर्माते सचिन ससाने यांनी गंभीर आरोप लावले आहेत.  

निर्मात्यांनी सयाजी शिंदे यांच्यावर फसवणूकीचा गंभीर आरोप लावला आहे. सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो असं सांगून पैसे घेतल्यानंतरही चित्रपटात काम न करता दिलेले पैसे परत न केल्याचा आरोप चित्रपटाचे निर्माते सचिन ससाने यांनी त्यांच्यावर केला आहे. दरम्यान या प्रकरणी सयाजी शिंदे यांच्याकडून अद्याप तरी कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण येणाऱ्या काळात कोणतं  वळण घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काहि दिवसांपुर्वी सयाजी शिंदे यांनी सचिन ससाने यांच्याकडून सिनेमात काम करतो सांगून ५ लाख रुपये घेतले होते. त्याचबरोबर दर दिवशी एक लाख रुपये तर पाच दिवसांचे पाच लाख रुपये अशी डिलही त्यांच्यामध्ये झाली होती. गिन्नाड असं या सिनेमाचं नाव आहे. पैसे घेतल्यानंतर जेव्हा शूटिंग सुरु होण्याची वेळ आली तेव्हा मात्र  सयाजी शिंदे यांनी स्क्रिप्ट मध्ये बदल करायला सुरुवात केली. 

निर्माते सचिन ससाने यांनी दिलेली अकरा पानाची स्क्रिप्ट फाडून टाकत चित्रपटाचं काम थांबवलं. चित्रपटात काम करण्याचं थांबवल्यानंतर सयाजी शिंदे यांना दिलेले पाच लाख रुपये आणि या दरम्यान झालेलं नुकसान दहा लाख रुपये म्हणजेच एकूण 15 लाख रुपयाची मागणी निर्माते सचिन ससाने यांनी सयाजी शिंदे यांना केली होती. सयाजी शिंदे यांनी देखील हे पैसे देतो असं मान्य केलं होतं मात्र ते अद्याप आतापर्यंत दिले नसल्याचं निर्माते सचिन ससाने यांनी सांगितलं आहे.

Read More