Marathi News> मनोरंजन
Advertisement

'टीका करणारे अपयशी आहेत, त्यांच्याच मनात...'; धर्मांतरवर जब्याची शालू स्पष्टच बोलली

Rajeshwari Kharat Religon Change Row: फँड्री फेम राजेश्वरी खरातने धर्मांतर मुद्द्यावर मौन सोडलं आहे. टीका करणाऱ्यांवर मांडलं स्पष्ट मत. 

'टीका करणारे अपयशी आहेत, त्यांच्याच मनात...'; धर्मांतरवर जब्याची शालू स्पष्टच बोलली

Rajeshwari Kharat Religion Change Controversy: अभिनेत्री राजेश्वरी खरात नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री सिनेमातून प्रकाशझोतात आली. या सिनेमात तिने 'शालू' ची भूमिका साकारली होती. आजही राजेश्वरीला शालू या नावानेच ओळखले जातात. राजेश्वरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव असते. तिने केलेल्या एका पोस्टमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. या फोटोला तिने Baptised अशी पोस्ट केली आहे. 

राजेश्वरीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. धर्मांतराच्या मुद्द्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले. टीकाकारांनी देखील तिच्यावर खूप टीका केल्या. राजेश्वरीने ईस्टर संडेला केलेल्या या पोस्टमुळे तिच्यावर धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला एवढंच नव्हे. यावर राजेश्वरीने राजश्रीला दिलेल्या मुलाखतीत मौन सोडलं आहे. धर्मांतरावर राजेश्वरी बोलली असून तिने ट्रोलर्सला देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. 

धर्मांतरावर काय बोलली? 

राजेश्वरीने सांगितलं की, माझा जन्म हा ख्रिश्चन घरातच झाला आहे. मी लहानपणापासूनच ख्रिश्चन आहे. त्यामुळे मी कधीही धर्म बदललेला नाही. पण मला खंत आहे की, लोकांचा दृष्टीकोन किती मर्यादित आहे. कोणतंही सत्य पाहायचंय नाही आणि टीका करायची हे कितपत योग्य आहे. 

टीकाकार अपयशी... 

धर्म बदलणं ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार आहे. पण लोकांनी त्यावर टीका करणं हे चुकीचं आहे. दुसरं मला असं देखील वाटतं की, जे लोक टीका करतात. त्यांच्या आयुष्यात खूप चिंता आहे. ही लोकं अपयशी आहेत त्यांच्या मनात खूप राग आहे. अशा लोकांना सोशल मीडिया ही जागा मिळते आणि मग अशा काही पोस्ट दिसल्या की मग त्यांच्या अपयशीपणा राग, द्वेष अशा सगळ्या गोष्टी मनात घेऊन कमेंट करतात.

Read More