Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kapil Sharma कडून चाहत्यांची इच्छा पूर्ण; पहिल्यांदा दाखवली मुलाची झलक

काय होती त्याच्या चाहत्यांची इच्छा? 

Kapil Sharma कडून चाहत्यांची इच्छा पूर्ण; पहिल्यांदा दाखवली मुलाची झलक

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) दोन मुलांचा बाबा झाला आहे. काही दिवसांपूर्वी कपिलच्या पत्नीने त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्यामुळे यंदाचा फादर्स डे त्याच्यासाठी अत्यंत खास होता. कपिलने त्याच्या दोन्ही मुलांसोबत फादर्स डे साजरा केला. सोबतचं कपिलने चाहत्यांना एक सरप्राईझ देखील. कपिलने दिलेलं सरप्राईझ पाहून त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सांगायचं झालं तर गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांनी कपिलकडे एक इच्छा व्यक्त  केली. चाहत्यांची इच्छा कपिलने पूर्ण केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कपिल शर्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये कपिल आणि त्याचे दोन मुलं दिसत आहेत. मुलांसोबत फोटो शेअर करत  कपिलने कॅप्शनध्ये, 'लोकांच्या मागणी... अनायरा आणि त्रिशान पहिल्यांदा एकत्र. हॅप्पी फादर्स डे' असं लिहीलं आहे. फोटोमध्ये  अनायरा आणि त्रिशान प्रचंड क्यूट दिसत आहेत. 

कपिलने मुलांचे फोटो शेअर करताचं त्यांच्या फोटोवर लाईक आणि कमेन्टचा पाऊस पडत आहे. सोशल मीडिया अनायरा आणि त्रिशानचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. 

Read More