Marathi News> मनोरंजन
Advertisement

फराह खानला पश्चाताप, स्वत: च्या गाण्याला म्हणाली घाणेरडं; आजही पार्टीमध्ये 'त्या' गाण्यावर थिरकतात लोकं

Farah Khan : फराह खाननं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

फराह खानला पश्चाताप, स्वत: च्या गाण्याला म्हणाली घाणेरडं; आजही पार्टीमध्ये 'त्या' गाण्यावर थिरकतात लोकं

Farah Khan : लोकप्रिय बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानला सगळेच ओळखतात. फराह खाननं आजवर अनेक चित्रपटातील गाणी ही रेकॉर्ड केली आहेत. फराहनं कोरिओग्राफ केलेली गाणी आजही अनेक पार्ट्यांमध्ये ऐकायला मिळतात. इतकंच नाही तर सगळ्यांना त्यावर नाचायला देखील आवडतं. 'ओम शांती ओम' ते 'हॅपी न्यू ईयर' पर्यंतच्या यशस्वी प्रवासानंतर आता फराह खान तिच्या YouTube सीरिजमुळेही चर्चेत आहे. या सीरिजमध्ये ती विविध सेलिब्रिटींच्या घरी जाते, गप्पा मारते, आणि मस्त कुकिंग सेशन्स करताना दिसते.

अलीकडेच एका एपिसोडमध्ये फराहनं ‘शीला की जवानी’ या गाण्याबद्दल मोकळेपणानं बोलली. हे तिच्या करिअरमधील एक मोठं हिट गाणं होतं, पण त्याच वेळी ते तिचं 'सगळ्यात चीप कोरियोग्राफी' गाण असल्याचं देखील म्हटलं आहे.

फराह खानचं 'सगळ्यात चीप' गाणं

फराह म्हणाली, "माझं सगळ्यात चीप गाणं म्हणजे 'शीला की जवानी'. जर तुम्ही ते गाणं बघाल, तर लक्षात येईल की यामध्ये कोणताही सेट नाही, ना मोठं प्रोडक्शन. फक्त दहा डान्सर होते आणि आम्ही अवघ्या साडेतीन तासांत चित्रीकरण पूर्ण केलं. पण हेच गाणं माझ्या टॉप तीन-चार गाण्यांमध्ये आहे."

सुनिधी चौहानचा आवाज आणि कतरिनाचा डान्स

विशाल-शेखरच्या जबरदस्त संगीतासोबत सुनिधी चौहानच्या दमदार आवाजानं 'शीला की जवानी' एकदम लोकप्रिय ठरलं . कतरिना कैफच्या बोल्ड परफॉर्मन्स आणि फराहच्या जबरदस्त कोरिओग्राफीमुळे हे गाणं 'तीस मार खान' चित्रपटातल्या सर्वात लक्षवेधी गाण्यांपैकी एक ठरलं. या गाण्यासाठी फराह खानला 'बेस्ट कोरिओग्राफी'साठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

कतरिनाचं स्पष्ट मत

याआधी झी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत कतरिना कैफनंही या गाण्याबद्दल तिचं मत मोकळेपणानं व्यक्त केलं होतं. ती म्हणाली होती," 'शीला की जवानी' हे मी केलेल्या गाण्यांपैकी सगळ्यात बोल्ड अगदी काहीसं अश्लील वाटणारा असा परफॉर्मन्स होता. पण तो माझ्यासाठी एक श‍िकण्याचा अनुभव ठरला. गाणं 'आयटम नंबर' म्हणवून घेण्यात मला काहीच वावगं वाटत नाही. यात थोडं एक्स्पोजर आहे, पण ते त्या गाण्याच्या थीमचा भाग होतं."

Read More