Marathi News> मनोरंजन
Advertisement

आसारामला दोषी ठरवल्यानंतर मोदींच्या फोटोवर बोलला फरहान अख्तर

पंतप्रधान मोदी आणि आसारामच्या फोटोवर बोलला फरहान अख्तर

आसारामला दोषी ठरवल्यानंतर मोदींच्या फोटोवर बोलला फरहान अख्तर

मुंबई : जोधपूर कोर्टाने लैंगिक शोषणाच्या आरोपात आसाराम बापूला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर काही लोकं पंतप्रधान मोदी आणि आसाराम यांचा एकत्र असलेला फोटो शेअर करत आहेत. ट्विटरवर याबाबत लोकं उलट सूटल ट्विट करत आहेत. यातच फरहान अख्तर यांने ट्विट करत अशा लोकांना फटकारलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने या फोटोबाबत ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं की, आसाराम आता एक चाइल्ड रेपिस्ट आहे आणि त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. चांगलं आहे. पण आता तुम्ही पंतप्रधान मोदींसोबतचा आसारामचा फोटो शेअर बंद करा. कोणत्याही अशा व्यक्तीचं संरक्षण करणं, किंवा त्याच्या सोबत उभं राहणं जेव्हा त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले नसतील. तर तो गुन्हा नाही आहे. निष्पक्ष रहा आणि ही गोष्ट लक्षात घ्या की ती व्यक्ती देखील आपल्या प्रमाणेच सत्य जाणून नव्हती.

Read More