Kapil Sharma Cafe Firing Again : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) कॅनडा येथील कॅफेवर पुन्हा एकदा फायरिंग करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे. सोशल मीडियावरून काही गॅंगस्टर्सनी पोस्ट टाकून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कपिल शर्मा आणि त्याच्या पत्नीने कॅनडामध्ये 'Kaps cafe' नावाने एक आलिशान कॅफे उघडलं होतं, काही महिन्यांपूर्वी येथे एका गटाने फायरिंग केल्याची घटना घडली होती. ही घटना जुनी होतेच तोवर पुन्हा एकदा कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला आहे. मीडिया वृत्तानुसार या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लों आणि लॉरेंस बिष्णोई गॅंगने घेतली आहे.
कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर फायरिंग झाल्याची बातमी सोशल मीडियातून समोर आलेली आहे. पोलीस आता या माहितीला व्हेरिफाय करत असून झी 24 तास या बातमीची पुष्टी करत नाही. कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आल्याचा व्हिडीओ समाज माध्यमातून समोर आलाय.
सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिण्यात आली. यात नमूद केले गेले की, 'जय श्री राम. सत श्री अकाल. सगळ्यांना राम राम. आज कपिल शर्माच्या "कैप्स कैफे" (Kaps Cafe) वर फायरिंग करण्यात आली. याची जबाबदारी गोल्डी ढिल्लों आणि लॉरेंस बिश्नोई गॅंगने घेतली आहे. आम्ही त्याला (संभावित लक्षाला) फोन केला होता, पण कदाचित त्याला रिंग ऐकू आली नाही म्हणून आम्हाला कारवाई करावी लागली. जर त्याला अजूनही रिंग ऐकू आली नसेल तर आम्ही लवकरच मुंबईत पुढील कारवाई करू'.
कनाडा में कपिल शर्मा के कैफे पर फिर फायरिंग, लॉरेंस गैंग ने ली जिम्मेदारी KapilSharma pic.twitter.com/MYts1PVEs2
Raajeev Chopra (Raajeev_Chopra) August 7, 2025
कपिल शर्माच्या या कॅफेवर गोळीबार झाल्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात 9 जुलै रोजी सुद्धा रात्रीच्या वेळी रात्री ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे कपिल शर्माच्या कॅनडास्थित Kaps Cafe वर गोळीबार करण्यात आला आहे. कपिलने काही महिन्यांपूर्वीच हे कॅफे उघडले होते. त्यावेळी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि एनआयए आणि बीकेआय (बब्बर खालसा इंटरनॅशनल) चा कार्यकर्ता हरजीत सिंग लाडीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. कपिल शर्माच्या भूतकाळातील काही विधाने मला आवडली नाहीत आणि त्यामुळे मी गोळीबाराचे आदेश दिल्याचे त्याने म्हटलं होतं.
1. कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा झालेल्या फायरिंग हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतली आहे?
मीडिया वृत्तानुसार, या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लों आणि लॉरेंस बिष्णोई गॅंगने घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
2. यापूर्वी Kaps Cafe वर केव्हा फायरिंग झाली होती?
यापूर्वी 9 जुलै 2025 रोजी कपिल शर्माच्या Kaps Cafe वर फायरिंग झाली होती, ज्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डी आणि बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) यांनी घेतली होती.
3. कपिल शर्माने या ताज्या हल्ल्याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे?
ताज्या हल्ल्याबाबत कपिल शर्माची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. यापूर्वी जुलै 2025 च्या हल्ल्यानंतर त्याने आणि त्याच्या कॅफे टीमने इन्स्टाग्रामवर एक निवेदन जारी केले होते, ज्यात त्यांनी हिंसाचाराविरुद्ध एकजुटीने उभे राहण्याचा आणि कॅफे पुन्हा उघडण्याचा निर्धार व्यक्त केला होता.