मुंबई : सिद्धूंनी केलेल्या वक्तव्यामुळे जनसामान्यांमध्ये तिव्र आक्रोश बघायला मिळत आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे. नुकताच विनोदवीर कपिल शर्मा चंदीगडमधील आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमात व्यसन मुक्त भारत मोहीमेत सहभागी झाला होता. कार्यक्रमात कपिलला सिद्धूंनी केलेल्या वक्तव्या संबंधित विचारणा करण्यात आली. तेव्हा कपिल सिद्धंची बाजू घेत म्हंटला ' नवजोत सिंग सिद्धू हे त्यांच्या काही कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग शूटिंग पूर्ण करणार आहेत काही दिवसांसाठी सिद्धू आमच्या सोबत काम करणार नाहीत.'
त्याचप्रमाणे कपिलने नवज्योत सिंग यांना शोमधून काढून टाकणे हा योग्य पर्याय नसून त्यावर मिळून तोडगा काढण्याचे सांगत सिद्धूंचे समर्थन केले आहे. त्यानंतर कपिलला पाकिस्तानी कलाकारांबद्दल विचारले असता, त्याने आपण सरकार सोबत असल्याचे सांगितले.
'पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादाविरोधी मी भारत सरकारच्या सोबत आहे. पण तरीही योग्य निर्णयाची अपेक्षा आहे. पुलवामामध्ये हल्ला घडवून आणणऱ्या हल्लेखोरांना शोधून मारले पाहिजे ज्यामध्ये संपूर्ण देश भारत सरकार सोबत उभा आहे.' असे वक्तव्य कपिलने केले.
सिद्धूंनी ट्विटर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये सिद्धूंनी म्हंटले आहे. 'विधानसभा सत्रात उपस्थित असल्यामुळे मला शूटिंगसाठी जाता आले नाही त्यामुळे माझ्या जागी दोन आठवड्यांसाठी अर्चनापूरन सिंग यांना रिप्लेस केले आहे आणि मी माझ्या वक्तव्यावर ठाम होतो, आहे आणि राहणार.' पाहा व्हिडिओ:
सत्य प्रताड़ित हो सकता है, पराजित नही होता।
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) February 18, 2019
Truth can be mutilated, but never defeated. 1/2 pic.twitter.com/fmk6sweKLG
सत्य प्रताड़ित हो सकता है, पराजित नही होता।
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) February 18, 2019
Truth can be mutilated, but never defeated. 2/2 pic.twitter.com/L2Tn9PAg0p