Marathi News> मनोरंजन
Advertisement

पंजाबमधील प्रसिद्ध गायक परमीश वर्मावर फायरिंग

पंजाबमधला प्रसिद्ध गायक आणि अभिनेता, डायरेक्टरवर जीवघेणा हल्ला झाला आहे.

पंजाबमधील प्रसिद्ध गायक परमीश वर्मावर फायरिंग

चंदीगड : पंजाबमधला प्रसिद्ध गायक आणि अभिनेता, डायरेक्टर परमीश वर्मा यांच्यावर मोहालीच्या सेक्टर 91 मध्ये रात्री अचानक जीवघेणा हल्ला झाला. एका कारमधून 3 ते 4 हल्लेखोर आले होते. ज्यांनी परमीशवर अचानक हल्ला केला. परमीश आणि त्याचा मित्र या हल्ल्यात जखमी झाला आहे. दिलप्रीत सिंह नावाच्या गँगस्टरने फेसबूकवर रिवॉल्वरसह एक फोटो शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. सोबतच त्याने म्हटलं की, तो यावेळी वाचला पण पुढच्या वेळी वाचणार नाही. 

दिलप्रीत सिंहने त्याच्या या पोस्टमध्ये फायरिंग मागचं कारण लिहिलं नाही. पंजाब पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. परमीश वर्मा हा पंजाबमधील एक प्रसिद्ध गायक आहे. त्याने सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. त्याला रुग्णालयात दाखल केलं असून तो सुखरुप आहे.

Read More