Marathi News> मनोरंजन
Advertisement

Box Office Collection Day 1: पहिल्या दिवशी '83' ने कमावला एवढ्या कोटी रूपयांचा गल्ला

पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर '83' सिनेमाचा बोलबाला

Box Office Collection Day 1:  पहिल्या दिवशी '83' ने कमावला एवढ्या कोटी रूपयांचा गल्ला

मुंबई : दोन वर्षांनंतर अखेर सिनेमागृह सुरू झाले आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी सिनेमा पाहाण्यासाठी सिनेमागृहाकडे  धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'सुर्यवंशी' सिनेमानंतर अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा '83' सिनेमा 24 डिसेंबररोजी प्रदर्शित झाला आहे. '83' प्रदर्शित होण्यापूर्वी ‘स्पायडर-मॅन’ आणि ‘पुष्पा’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यामुळे येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

83 सिनेमाची झालेली रंगलेली चर्चा आणि चाहत्यांचं प्रेम यामुळे '83' बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडू शकतो. काही ठिकाणी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला पण काही ठिकाणी मात्र निर्माते निराश झाले.  मुंबई, दिल्ली-एनसीआर, कोलकाता आणि बंगळुरूसारख्या मेट्रो शहरांमध्ये सिनेमाला चांगली ओपनिंग मिळाली. 

परंतु छोट्या शहरांमध्ये 10 ते 30 टक्क्यांनी घट झाली आहे. आता नाताळच्या सुट्टीचा फायदा सिनेमाला मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बॉक्स ऑफिसच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, '83' सिनेमाने पहिल्या दिवशी 14-15 कोटींची कमाई केली आहे.

'स्पायडर-मॅन' आणि 'पुष्पा' सध्या बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहेत, त्यामुळे 83 ची सुरुवात चांगली मानली जात आहे. वीकेंडला बॉक्स ऑफिसवर 83 झेप घेईल असा विश्वास आहे. 'सूर्यवंशी' नंतरचा हा दुसरा सिनेमा आहे ज्याने मोठी ओपनिंग घेतली आहे. 'सूर्यवंशी' सिनेमाने पहिल्याच दिवशी 26 कोटींची कमाई केली.

Read More