Marathi News> मनोरंजन
Advertisement

पहिल्या दिवशी अय्यारी सिनेमाने केली 'इतकी' कमाई!

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री रकुल प्रीत आणि मनोज वाजपेयी यांचा अय्यारी हा सिनेमा १६ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. 

पहिल्या दिवशी अय्यारी सिनेमाने केली 'इतकी' कमाई!

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री रकुल प्रीत आणि मनोज वाजपेयी यांचा अय्यारी हा सिनेमा १६ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. या सिनेमाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. मात्र ते फारसे समाधकारक नसून ज्याप्रकारे सिनेमाकडून अपेक्षा होती. त्यास सिनेमा पात्र ठरू शकलेला नाही.

ही आहे पहिल्या दिवसाची कमाई

फिल्म समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करुन अय्यारी सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची माहिती दिली. सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई ३.३६ कोटी रुपये आहे. यापूर्वी सिद्धार्थच्या ए जेंटलमॅनने पहिल्या दिवशी ४.०४ कोटी तर इत्तेफाकने ४.०५ कोटी इतकी कमाई केली होती. याचा अर्थ अय्यारीची ओपनिंग इतर दोन चित्रपटांच्या तुलनेत कमी आहे.

कसा आहे सिनेमा?

असे जरी असले तरी सिनेमातील सिद्धार्थ आणि मनोजच्या अभिनायचे कौतुक करण्यात आले आहे. मात्र सिनेमाची कथा काहीशी कन्फ्यूजिंग आहे. सिनेमाचा पूर्ण भार मनोज वाजपेयीने त्याच्या मजबूत खांद्यावर उचलला आहे. आपल्या खास शैलीत मनोज वाजपेयीने रंग भरले आहेत. हा सिनेमा पूर्वी २५ जानेवारीला प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र पद्मावतच्या बदललेल्या रिलीज डेटमुळे हा सिनेमा १६ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यात आला. 

fallbacks

Read More