Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणवीर सिंगचा सिम्बामधील फर्स्ट लूक...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच सिम्बा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रणवीर सिंगचा सिम्बामधील फर्स्ट लूक...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच सिम्बा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग संग्राम भालेराव ही व्यक्तिरेखा निभावणार आहे. अशा प्रकारच्या व्यक्तिरेखेत रणवीर पहिल्यांदाच दिसणार असल्यामुळे त्याचे चाहते भलतेच उत्सुक आहेत. रोहीत शेट्टी या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सेटवरुन रणवीरचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला.

चाहत्यांना उत्सुकता

यात रणवीर निळ्या रंगाच्या शर्ट-पॅंटमध्ये दिसत आहे. रणवीरचा हा लूक पाहुन तुम्हाला सिंघममधील अजय देवगणची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पण रणवीर तडफदार पोलीसाची भूमिकेत दिसणार की मनमौजी, गंमतीरशीर पोलिस अधिकारी साकारणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

fallbacks

 सारा-रणवीरची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

फोटो शेअर करत रणवीरने लिहिले की, रोहीत शेट्टीचा हिरो... या सिनेमात रणवीर सिंगसोबत सारा अली खान प्रमुख भूमिकेत आहे. यापूर्वी सारा केदारनाथ हा सिनेमा करत होती. मात्र केदारनाथ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्याच्या अडकल्याने सिम्बा हा तिचा डेब्यू सिनेमा ठरु शकतो. रणवीर-साराचा हा सिनेमा २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सध्या सिनेमाचे शूटिंग रामोजी फिल्म सिटीत सुरु आहे. 

Read More