Marathi News> मनोरंजन
Advertisement

पहिल्यांदा प्लास्टिक सर्जरी करण्यावर काय बोलली ऐश्वर्या राय?

काय म्हणाली ऐश्वर्या

पहिल्यांदा प्लास्टिक सर्जरी करण्यावर काय बोलली ऐश्वर्या राय?

मुंबई : जगभरातून ऐश्वर्या रायच्या सुंदरतेला कुणीच टक्कर देऊ शकत नाही? करण जोहरच्या एका कार्यक्रमात इमराश हाशमीने एक धक्कादायक खुलासा केला होता. त्याने ऐश्वर्या रायला प्लास्टिक म्हणून सगळीकडे खळबळ उडवली होती. या वक्तव्यानंतर अशी चर्चा होती की, ऐश्वर्या राय बच्चनने प्लास्टिक सर्जरी केली आहे. 

आताच एका मुलाखतीत ऐश्वर्या रायने कॉस्मेटिक सर्जरी करण्यावर एक वक्तव्य केलं होतं. ऐश्वर्या राय बच्चनने सांगितलं की, या दरम्यान काहीच कुणाकडून लपत नाही. ही आपला खाजगी प्रश्न आहे की, आपण स्वतःसाठी काय निवडतो. यावेळी ऐश्वर्याने आपल्या डाएटबद्दल देखील अगदी मोकळ्या गप्पा मारल्या. ऐश्वर्या म्हणते की, तिने आतापर्यंत कधीच डाएट प्लान फॉलो केलेला नाही. काही लोकांना डाएट प्लानची कधीच गरज लागत नाही. मात्र जर कुणी असं फॉलो करत असेल तर त्याने योग्य माहिती घेऊनच फॉलो करणं गरजेचं आहे. 

ऐश्वर्याचा नुकताच फन्ने खान हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल केलेली नाही. 

Read More