Marathi News> मनोरंजन
Advertisement

फिटनेस क्वीन जॅकलिनचे पोल वर्कआऊट सीक्रेट्स; जाणून घ्या 4 खास फायदे

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिचा एक व्यायामाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात ती पोल वर्कआऊट करताना दिसत आहे. पाहूयात हा व्हिडीओ.  

फिटनेस क्वीन जॅकलिनचे पोल वर्कआऊट सीक्रेट्स; जाणून घ्या 4 खास फायदे

Jacqueline Fernandez Pole Workout : बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाणारी जॅकलिन फर्नांडिस सध्या तिच्या फिटनेस आणि पोल वर्कआऊटमुळे विशेष चर्चेत आहे. फिटनेसबद्दल बोलताना जॅकलिनचे नाव हमखास घेतले जाते. स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी ती सतत मेहनत करते आणि तिचा आवडता व्यायाम म्हणजे पोल वर्कआऊट. ती नेहमीचं तिच्या इन्स्टाग्रामवर वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत असते. अलीकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती पोलवर विविध व्यायम करताना दिसते. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे - 'संपूर्ण ताकद आणि प्रशिक्षण... खूप कठीण, पण एकदा जमले की त्याचे समाधान वेगळंच असतं.'

पोल वर्कआऊट हा केवळ एक डान्स फॉर्म नसून, तो पूर्ण शरीराचा व्यायाम आहे. यामुळे ताकद, लवचिकता आणि संतुलन वाढते. जिमचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं, मजेदार करून पाहायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे.

पोल वर्कआऊटचे फायदे:

1. संपूर्ण शरीराला ताकद आणि ऊर्जा

पोल वर्कआऊटमध्ये शरीराचा संपूर्ण भार पोलवर पडतो, ज्यामुळे हात, खांदे, पाठ, पोट आणि पाय यांसारख्या सर्व स्नायूंवर ताण येतो. हे स्नायू सक्रिय होऊन अधिक मजबूत होतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, पोल वर्कआऊट हा शरीराला बळकट ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आहे. हा कॅलिस्थेनिक्सचा एक भाग आहे, ज्यात शरीराचं वजन वापरून व्यायाम केला जातो.

2. लवचिकता आणि संतुलन वाढते

या व्यायामात शरीर वेगवेगळ्या दिशांना वाकवलं जातं, ज्यामुळे स्नायू स्ट्रेच होतात. नियमित सराव केल्याने लवचिकता वाढते, हालचालींमध्ये गती येते आणि दुखापतीचा धोका कमी होतो. पोलवर संतुलन राखण्याची सवय लागल्याने दैनंदिन कामातही चांगलं संतुलन साधता येतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

3. वजन कमी करण्यात मदत

पोल वर्कआऊट हा कार्डिओ वर्कआऊट असून तो हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगला आहे. विविध हालचाली करताना शरीर मोठ्या प्रमाणावर कॅलरीज बर्न करतं, ज्यामुळे चरबी कमी होऊन वजन नियंत्रणात राहायला मदत होते.

4. मानसिक आरोग्यासाठी लाभदायी

हा व्यायाम शारीरिक फिटनेससोबतच मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तो मजेदार आणि आव्हानात्मक असल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. नवीन आणि अवघड हालचाल यशस्वीरीत्या केल्यावर समाधानाची भावना निर्माण होते. यामुळे ताण-तणाव, चिंता कमी होतात आणि मन प्रसन्न राहते.

आजकाल आलिया भट्ट, जॅकलिन फर्नांडिस आणि क्रिती सेनन यांसारखे अनेक बॉलिवूड स्टार्स त्यांच्या फिटनेस रूटीनमध्ये पोल वर्कआऊटचा समावेश करत आहेत. तुम्हालाही तुमच्या फिटनेस प्रवासात काहीतरी नवीन जोडायचं असल्यास, पोल वर्कआऊट हा नक्कीच एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.

Read More