Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aryan Khan च्या सुटकेसाठी आता गौरीने उचललं मोठं पाऊल

दिवसभर कायदेशीर तज्ञ आणि जवळच्या मित्रांशी ते बोलत आहेत. 

Aryan Khan च्या सुटकेसाठी आता गौरीने उचललं मोठं पाऊल

मुंबई : सध्या शाहरुख आणि गौरी खान दोघेही मुलाला सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत. दिवसभर कायदेशीर तज्ञ आणि जवळच्या मित्रांशी ते बोलत आहेत. आर्यनला सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण त्याचे वकील आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्यातील प्रदीर्घ कायदेशीर लढाईत बदलले आहे.

दरम्यान, शाहरुखच्या फॅमिली फ्रेण्डने सांगितले की, गौरी खानने आर्यनच्या सुटकेसाठी व्रत केले आहे आणि नवरात्रीदरम्यान साखर आणि मिठाईपासून दूर राहून सतत प्रार्थना करत आहे.

मुलासाठी गोड खाणं ही सोडलं

 मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आहे. परिणामी, आर्यनला किमान 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागेल.

एका फॅमिली फ्रेण्डने म्हणण्यानुसार, शाहरुख आणि गौरी दोघेही दिवसेंदिवस खूप चिंताग्रस्त होत आहेत. जवळच्यांच्या मते, गौरीने आर्यनसाठी व्रत केले आहे आणि नवरात्रीच्या दरम्यान सतत प्रार्थना करत आहे. सण सुरू झाल्यापासून तिने साखर आणि मिठाईचा त्याग केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिनेही गेल्या सुनावणीच्या आधी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देवीचा फोटो शेअर केला होता. त्यांनी 'थँक यू माता राणी' लिहिले. त्यावेळी शाहरुख खान आणि गौरी दोघांनाही वाटले की आर्यन दुसऱ्या दिवशी जामिनावर बाहेर येईल. पण तसे झाले नाही.

Read More