मुंबई : 'बिग बॉस' फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आज कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांना सोडून कायमचा निघून गेला. आता फक्त त्याच्या आठवणी आपल्यात जिवंत आहेत. सिद्धार्थचं ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर आता सिद्धार्थ शुक्लाचं अकस्मित निधन मनाला चटका लावणारं आहे. कलाविश्वाला दोन अभिनेत्यांची कमी कायम भासत राहील. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहे.
'सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी आणि चाहत्यांसाठी मला खरोखर दिलगीर आहे. तुझी कमी कायम भासेल...' असं ट्विट करणवीर शर्माने केलं आहे. करणवीर शिवाय अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली आहे.
I’m truly sorry for Siddharth’s loved ones and fans. This is devastating. You will be missed
— Karanvir Sharma (@karanvirsharma9) September 2, 2021
Om Shanti #SiddharthShukla
Another reminder of how fragile life is.
— Virender Sehwag (@virendersehwag) September 2, 2021
Heartfelt condolences to #SiddharthShukla 's family and friends.
Om Shanti pic.twitter.com/zTinZmyaJ5
बालिका वधू सीरियल में अपने अभिनय से अमिट छाप छोड़ने वाले अभिनेता और बिग बॉस विनर सिद्धार्थ शुक्ला जी के असामयिक निधन का दु:खद समाचार मिला। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति दे और शोकाकुल परिजनों व प्रशंसकों को इस दुख को सहन करने का धैर्य व संबल प्रदान करें।
— Spurdha Choudhary (@SpurdhaOfficial) September 2, 2021
#SiddharthShukla
शायद वो दुनिया इस दुनिया से बेहतर हो जहाँ तुम चले गए @sidharth_shukla… हमेशा याद रहोगे दोस्त! pic.twitter.com/oxVDRT4c5r
— Manoj Muntashir (@manojmuntashir) September 2, 2021
सिद्धार्थबद्दल सांगायचं झालं तर, फार कमी वयात त्याने जगाचा निरोप घेतला आहे. 'बिग बॉतस 13' आणि 'खतरो के खिलाडी' रियालिटी शोचा विनर आज आपल्यातून हरवला आहे. रियालिटी शोनंतर त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. तो मालिकांपर्यंत मर्यादित न राहाता त्याने हिंदी चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर 'हम्टी की दुल्हनिया' चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर एकता कपूर दिग्दर्शित 'ब्रोकन बट ब्यूटीफुल 3' सीरिजमध्ये त्याने 'अगस्त' ही भूमिका साकारली होती.
12 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेला सिद्धार्थ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. एका मॉडेलच्या रूपात त्याने करियरला सुरूवात केली. त्यानंतर 2004 साली त्याने अभिनयात पदार्पण केलं. 2008 रोजी त्याने 'बाबुल का आंगन छूटे' या मालिकेत दिसला. पण सिद्धार्थला लोकप्रियता 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून मिळाली.