Movie Ticket Price to 200 Rs : आपल्या सगळ्यांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायला मज्जा येते कारण त्याचा आनंद हा वेगळाच आहे. दरम्यान, आता हा आनंद वाढण्याची शक्यता आहे. कारण आता सिंगल स्क्रीन असो किंवा मग मल्टीप्लेक्स तुम्हाला आता चित्रपट फक्त 200 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. तुम्ही कोणत्याही चित्रपटाचं तिकिट घ्या त्याची किंमत ही फक्त 200 रुपये असणार आहे. पण त्यात एक ट्विस्ट आहे आणि तो म्हणजे 200 रुपयांमध्ये तुम्ही थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. सिद्धारमैया यांच्या सरकारनं शुक्रवारी 7 मार्च रोजी चित्रपटप्रेमींसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. मल्टीप्लेक्सवरील चित्रपटांच्या तिकिटावर मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी घोषणा केली की आता कोणताही चित्रपट असला तरी त्याचं तिकिट हे 200 रुपये असणार आहे.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी त्याच्या 16 व्या बजेटमध्ये हा निर्णय घेतला आहे की संपूर्ण कर्नाटकात मल्टीप्लेक्समध्ये चित्रपटांची किंमती ठरवण्यात आल्या आहेत. आता तिकिटांची सगळ्यात जास्त जर काही किंमत असेल तर ती 200 रुपये असेल. तर आतापर्यंत मल्टीप्लेक्समध्ये एक चित्रपट पाहण्यासाठी 700 ते 1000-1200 रुपये मोजावे लागत होते. पण आता सिद्धारमैया यांनी घेतलेल्या या निर्णयानं चित्रपट निर्मात्यांना मोठा झटका बसू शकतो.
खरंतर, तुम्ही चित्रपटात आणि सिंगल स्क्रीन थिएटर्सची तुलनेत मल्टीप्लेक्सच्या तिकिटांची किंमत ही जास्त असते. आता सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये बाल्कनी आणि फर्स्ट क्लासच्या तिकिटांच्या किंमतीत जास्त फरक नसतो. तर मल्टीप्लेक्सचे तिकिट खूप महागडे असतात. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जशी जशी प्रेक्षकांची गर्दी वाढते तसे तिकिटांची किंमत वाढते. पण आता परिस्थिती अशी आहे की तिकिटांची किंमत ही फक्त 200 रुपये असणार आहे.
त्यासोबत मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी कन्नड चित्रपटांना घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटलं की 'एक ओटीटी प्लॅटफॉर्म बनवण्यात येईल जेणे करून कन्नड चित्रपटांना संधी मिळेल. तर त्यांनी हा निर्णय कसा आणि कशावरून घेतला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं कारण म्हणजे ऋषभ शेट्टी आणि रक्षित शेट्टी सारखे अनेक कन्नड कलाकारांनी तक्रार केली होती की अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म हे कन्नड चित्रपटांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर संधी देत नाही. याच कारणामुळे रक्षित शेट्टीच्या प्रोडक्शन हाउसला जुलै 2024 मध्ये स्वत: ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची गरज पडली होती. जेणे करून ते त्यांची वेब सीरिज 'एकम' ला प्रदर्शित कूर शकतील.'
हेही वाचा : 'तू किती वेळा देश...', अक्षय कुमारच्या देशभक्तीवरील चित्रपटांवरून पत्नी ट्विंकल उडवते खिल्ली; स्वत: केला खुलासा
पुढे सिद्धारमैया यांनी हे देखील सांगितलं की 'सिने सेक्टरला आता एक इंडस्टीचा दर्जा देण्यात येईल आणि इंडस्ट्रीयल पॉलिसी अंतर्गत देण्यात येणारी सुविधा देखील मिळतील. त्याशिवाय मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी कन्नड चित्रपटांना डिजिटल आणि गैर-डिजिटल आर्काइव्ह बनवण्यासाठी 3 कोटी देण्यात येणार आहे. ज्याचा उद्देश राज्याचं सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतीचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या कामाला संरक्षित करण्यासाठी हे करण्यात येणार आहे.'