Marathi News> मनोरंजन
Advertisement

Gadar 2 पाहून प्रेक्षकांनी दिल्या एका शब्दातच प्रतिक्रिया, समजून घ्या Public Review

Gadar 2 Public Review: आज 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे एडव्हान्स बुकिंग फारच चांगले होते. त्यामुळे पहिल्या वहिल्या शोला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की या चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू काय आहे? 

Gadar 2 पाहून प्रेक्षकांनी दिल्या एका शब्दातच प्रतिक्रिया, समजून घ्या Public Review

Gadar 2 Public Review: आज 11 ऑगस्ट आहे. आजच्या दिवशी दोन मोठे सिनेमे हे प्रदर्शित झालेले आहेत. या दोन्ही चित्रपटांची गेल्या महिन्याभरापासून जोरदार चर्चा रंगली होती. अखेर हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 22 वर्षांपुर्वी आलेला 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यावेळी या चित्रपटातून अमरिश पुरी, अमिषा पटेल, सनी देओल यांच्या भुमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यातून या चित्रपटाची गाणीही प्रचंड हीट झाली होती.

'मैं निकाला हो गड्डी लेके' हे गाणं प्रचंड गाजले होते. त्यातून आता जवळपास दोन दशकानंतर हा चित्रपट नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून अमीषा पटेल आणि सनी देओल यांच्या या चित्रपटात प्रमुख भुमिका आहेत. त्यातुन यावेळी ट्विटरवरून प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया उमटायला सुरूवात केली आहे. तेव्हा यावेळी पाहुया की नक्की पब्लिक रिव्ह्यू नक्की काय आहे?

सुप्रसिद्ध ट्रेण्ड विश्लेषक तरण आदर्श यांनी यावेळी आपली या चित्रपटाबद्दलची प्रतिक्रिया नोंदवली आहे. यावेळी त्यांनी पाचपैंकी या चित्रपटाला 2.5 हे रेटिंग दिलं आहे. त्यातून या चित्रपटाला Unbearanble म्हणजे सहन होण्याच्या बाहेरील फिल्म असा एका शब्दातला रिव्ह्यू दिला आहे. त्यातून अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला नेगेटिव्ह रिव्ह्यूज हे दिले आहेत. त्याचसोबत काहींना हा चित्रपट आवडला आहे. यावेळी या चित्रपटाला राजकीय पार्श्वभुमी असल्याकारणानं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरू शकेल अशी काहींना अपेक्षा आहे. तेव्हा आज या चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे की पहिल्याच दिवशी हा चित्रपट कितीची ओपनिंग करणार आहे.  

हेही वाचा - हे तर होणारच होतं...; चाहत्यांची गर्दी फळली, पहिल्याच दिवशी Jailor नं कमवले 'इतके' कोटी

सिनेमा हा सिनेमा असतो. चित्रपट हे फारच प्रभावी माध्यमं आहे. त्यातून चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शन फसलं की सगळंच फसतं. अनेकांनी ट्विटरवर यावर रिव्ह्यू द्यायला सुरूवात केली आहे. यावेळी एकानं लिहिलं आहे की, हा चित्रपट म्हणजे एक डोकेदुखी आहे. त्याचबरोबर एकानं लिहिलंय की, हा चित्रपट म्हणजे 3rd क्लास भोजपूरी फिल्म आहे. तर अनेकांनी या चित्रपटाच्या पटकथेवर आणि कथेवर आक्षेप घेतला आहे. त्यातून यावेळी या चित्रपटावर सेन्सॉरबोर्डानंही कात्री लावली आहे. 

Read More