मुंबई: टेलिव्हिजनवरील बहुचर्चित 'गेम ऑफ थ्रोन्स' या मालिकेचा अखेरचा सिझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांमध्ये याबद्दल उत्सुकता होती.
एचबीओकडून मंगळवारी संध्याकाळी शेवटच्या सिझनचं अँथम ट्विटरवर शेअर करण्यात आले.
'गेम ऑफ थ्रोन्स' चे पहिले सात सिझन जगभरात कमालीचे लोकप्रिय झाले होते. त्यामुळे प्रेक्षक आठव्या आणि अखेरच्या सिझनची चाहते आतूरतेने वाट पाहत होते. हा सिझन २०१९मध्ये येणार हे निश्चित होते. पण तो नेमका कधी येणार याबाबत उत्सुकता लागून राहिली होती.
अँथमच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात मालिकेचा आठवा सिझन दाखवला जाईल, हे घोषित करण्यात आले.
Every battle.
— Game Of Thrones (@GameOfThrones) November 13, 2018
Every betrayal.
Every risk.
Every fight.
Every sacrifice.
Every death.
All #ForTheThrone. pic.twitter.com/WReVt473SH