Marathi News> मनोरंजन
Advertisement

गणपती बाप्पासाठी सनीच्या लेकीची लगबग पाहिली?

तिच्या पूर्ण कुटुंबाने गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली. 

गणपती बाप्पासाठी सनीच्या लेकीची लगबग पाहिली?

मुंबई : सार्वजनिक मंडळांपासून ते अगदी घराघरापर्यंत सर्वत्र सध्या  उत्साह पाहायला मिळत आहे तो म्हणजे गणेश चतुर्थीचा. दरवर्षीप्रमाणेच गणपती बाप्पा यंदाही सर्वांच्या घरी विराजमान झाले. प्रत्येकानेच मोठ्या थाटामाटात आपल्याला शक्य त्या परिने या लाडक्या गणरायाचं स्वागत केलं. यांमध्ये सेलिब्रिटी मंडळीही मागे राहिली नाहीत. व्यापार, क्रीडा आणि कला अशा विविध क्षेत्रांतील मंडळींनीही त्यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली. 

अभिनेत्री सनी लिओनी आणि तिच्या पूर्ण कुटुंबाने गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली. गणपती म्हटलं की अबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहू लागतो. सनीच्या लेकीचा म्हणजेच निशाचा उत्साहसुद्धा असाच प्रकारे ओसंडून वाहत होता. गणपतीची मूर्ती पाहिल्यानंतर ती हातात घेण्यासाठी म्हणून निशा धावत गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळचा एक व्हिड़िओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आणि फोटोंमध्ये सनी, तिचा पती डॅनिअल वेबर आणि मुलं हे सर्वजण पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. सुरेख आणि तितक्याच उठावदार अशा रंगांची सांगड घालत हे सेलिब्रिटी कुटुंब या उत्सवाचा आनंद घेताना दिसलं. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. 

स्वत:च्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची सनीची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षीसुद्धा तिने घरी गणपतीची प्रतिष्ठापुना करत पूजाअर्चा केली होती. कामाच्या व्यापातून वेळ काढच , सणवार साजरा करण्याला आणि आपल्या मुलांचं सुयोग्य संगोरन करण्याला सनी आणि तिचा पती डॅनिअल कायमच प्राधान्य देत असतात. 

Read More