Marathi News> मनोरंजन
Advertisement

15 किलोच्या कॉस्ट्यूमसोबत परफॉर्म करणार गौहर खान...

पाहा हा ड्रेस 

15 किलोच्या कॉस्ट्यूमसोबत परफॉर्म करणार गौहर खान...

मुंबई : अभिनेत्री गौहर खान लवकरच मोठ्या पडद्यावर वापसी करत आहे. यावेळी गौहर खान एका स्पेशल डान्स करणार आहे. या करता गेल्या कित्येक दिवसांपासून तिला भरपूर मेहनत करावी लागत आहे. स्पेशल डान्समधून गौहर वापसी करत आहे तो म्हणजे मुजरा आहे. या गाण्याच्या स्टेप्स करता गौहर खान जेवढी भरपूर मेहनत करत असून त्याकरता तसेच कपडे आणि दागिने परिधान केले आहेत. 

डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, या गाण्यात गौहरने 12 किलोचे कपडे परिधान केले असून 3 किलोचे दागिने घालते आहेत. या गाण्याला सरोज खानने कोरिओग्राफ केलं आहे. गौहरचे म्हणणे आहे की, आमच्याकडे वेळ कमी होती. असं असतानाही मी तयारी केली. भरपूर जड कपडे असल्यामुळे डान्स करताना त्रास होत होता. तसेच माझ्या कोणत्याही छोट्याशा चुकीमुळे सरोज खान नाराज होऊ नयेत असं देखील मला वाटत होते. 

Read More