Marathi News> मनोरंजन
Advertisement

Gauhar Khan shocked to see paparazzi: समजत नाही हे असं का वागतात? गौहार खान भडकली

पापाराझीचं कोणतं वागणं गोहर खानला पटलं नाही? 

Gauhar Khan shocked to see paparazzi: समजत नाही हे असं का वागतात? गौहार खान भडकली

मुंबई : मुंबईतील पापाराझी कल्चर आहे. सेलेब्सची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी प्रयत्नशील असतात. जेव्हा गौहर खान मुंबईत दिसली तेव्हा तिचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सनी असे काही केले की गौहर खानने चक्क आपले डोके पकडले. इतकंच नाही तर अभिनेत्री भडकली आणि म्हणाली की माहित नाही हे लोक असं का करतात?

गौहर खान जेव्हा मुंबईत दिसली तेव्हा तिचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्समध्ये झुंबड उडाली.या गर्दीत आणि चेंगराचेंगरीत पापाराझींनी दुकानाच्या बाहेर ठेवलेला पुतळाही खाली पाडला. पापाराझींचे असे वागणे पाहून गौहर खानने कपाळाला हात लावून सांगितले की, हे लोक असे का करतात हे मला कळत नाही.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर नेटिझन्सही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तसे, ही काही पहिलीच वेळ नाही, परंतु सेलिब्रिटींचे फोटो काढण्याच्या प्रक्रियेत फोटोग्राफर्सकडून अनेकदा अशा चुका होतात.

गौहर खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा अशा मुद्द्यांवर आपले मत उघडपणे व्यक्त करते. अलीकडेच, एका महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती रस्त्यावरील विक्रेत्यांकडून फळे उचलून खाली फेकताना दिसत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करणारी गौहर खान टीव्ही सीरियल, चित्रपट, म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. आणि ती एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे, म्हणूनच तिचे फोटो काढण्यासाठी मीडिया उत्सुक आहे.

Read More