B Town Richest Star Wife : बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी चाहत्यांच्या मनात कमाल कुतूहल असतं. कलाकारांच्या कुटुंबामध्ये कोण आहे, त्यांच्या कुटुंबातील मंडळी नेमकं काय काम करतात? असेच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत असतात. अशाच या सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक चर्चा असते ती म्हणजे अभिनेत्यांच्या पत्नी आणि त्यांच्या कामाची. बी टाऊनमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांच्या पत्नी कायमच चर्चेत असतात. असाच एक कमाल प्रतिभावान चेहरा अशा व्यक्तीचा आहे, जिच्या एकूण संपत्तीचा आकडा 1600 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं म्हटलं जातं.
श्रीमंतीच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्यांमध्ये आलिया आणि दीपिका यांच्यापेक्षाही सरस असणारा एक चेहरा प्रसिद्धीच्याच नव्हे, तर बॉलिवूडमध्ये लोकप्रियता आणि मान सन्मानाच्या बाबतीतसुद्धा लक्ष वेधतो. हा चेहरा म्हणजे गौरी खान. अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिला कलाजगतामध्ये 'फर्स्ट लेडी ऑफ बॉलिवूड' असंही म्हटलं जातं. स्वत:ची निर्मिती संस्था असणारी गौरी खान ही एक इंटेरिअर डिझायनर असून अनेक सेलिब्रिटींच्या आलिशान घरांचं इंटेअर तिनंच केलं आहे. कलाप्रेमी गौरी तिच्या याच कलेच्या बळावर कोट्यवधींची कमाई करते.
लाईफस्टाईल एशियाच्या रिपोर्टनुसार गौरी खानच्या एकूण उत्पन्नाचा आकडा 1600 कोटी रुपये इतका आहे. गौरीनं 2010 मध्ये अधिकृतरित्या इंटेरिअर डिझायनिंग क्षेत्रात तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि 2017 ला तिनं स्वत:चा स्टुडिओ लाँच केला. 2002 पासून गौरी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. ज्या निर्मिती संस्थेअंतर्गत अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. गौरी अनेक जाहिरातींच्या माध्यमातूनही तगडं मानधन घेते असं म्हटलं जातं.
गौरीच्या तुलनेत दीपिका आणि आलियाच्या एकूण संपत्तीचा आकडा पाहिल्यास दीपिकाची एकूण संपत्ती 500 कोटी आणि आलियाची एकूण संपत्ती 550 कोटींच्या घरात असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते. त्यामुळं सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी वाईफ म्हणून गौरीच आघाडीवर आहे यात वाद नाही.