Marathi Actress: मराठी अभिनेत्री गौतमी कपूर सध्या तिच्या एका जुन्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या या मुलाखतीतील एका वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत गौतमी कपूरने सांगितले की, तिने आपल्या मुलीच्या 16व्या वाढदिवसानिमित्त तिला एक सेक्स टॉय किंवा वायब्रेटर गिफ्ट देण्याचा विचार केला होता.
भारतीय समाजात बहुतांश पालक आपल्या मुलांशी लैंगिक विषयांवर चर्चा करण्यास टाळतात. त्यामुळे गौतमी कपूरच्या या विधानावर अनेकांनी संताप व्यक्त केला. तर काहींनी तिच्या खुलेपणाचे कौतुक केले.
जेव्हा गौतमी कपूरने तिच्या 16 वर्षीय मुलीला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. तेव्हा अभिनेत्रीने तिला सेक्स टॉय गिफ्ट देऊ का? की व्हायब्रेटर गिफ्ट करू? असं प्रश्न विचारला होता. तेव्हा मुलीला वाटलं की आई हे सगळं गमतीत विचारत आहे असं तिला वाटलं. सध्या याचाच व्हिडीओ हॉटरफ्लायने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
यामध्ये तिने व्हायब्रेटर का गिफ्ट करण्याचा विचार केला. याबद्दल मुलीला विचारले असता ती म्हणाली सिया, मी असा विचार का करत आहे. त्यावर सिया म्हणाली की, आई, तू वेडी झाली आहेस का? तुझं डोकं जागेवर आहे का? असं गौतमीने सांगितलं.
देशात मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन आणि तरुण सेक्स टॉय वापरत असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत हे टॉय पुनरुत्पादन आरोग्यासाठी सुरक्षित आहे का असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रेटर नोएडातील फोर्टिस हॉस्पिटलच्या माजी असोसिएट गायनकोलॉजिस्ट आणि आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉ. सोनाली गुप्ता यांनी News18 शी बोलताना सांगितले की, 'आता काळ खूप बदलला आहे आणि लोक लैंगिक आयुष्यात नवनवीन गोष्टी ट्राय करत आहेत. आजकाल मोठ्या प्रमाणावर तरुण सेक्स टॉयचा वापर करत आहेत. हे टॉय पुनरुत्पादन आरोग्यासाठी घातक नाहीत पण यांचा वापर काळजीपूर्वक करावा आणि व्यसनापासून दूर राहावे.'
डॉ. गुप्ता यांच्या मते, सेक्स टॉयमुळे अनेक तरुण-तरुणींना आनंद मिळतो आणि लैंगिक संबंधांविषयी जागरूकता निर्माण होते. काही वैद्यकीय समस्यांमध्ये रुग्णांना डॉक्टरांकडूनही अशा टॉयच्या वापराची शिफारस केली जाते. मात्र, टीनएजर्स हे टॉय डॉक्टरांच्या सल्ल्याविना स्वतःच्या इच्छेने वापरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
FAQ
गौतमी कपूर सध्या चर्चेत का आहे?
गौतमी कपूर सध्या तिच्या जुन्या मुलाखतीतील सेक्स टॉय किंवा वायब्रेटर गिफ्ट देण्याच्या विधानामुळे चर्चेत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गौतमीच्या मुलीने काय प्रतिक्रिया दिली?
मुलीला वाटले की तिची आई हे गमतीत विचारत आहे, आणि तिने विचारले, "आई, तू वेडी झाली आहेस का? तुझं डोकं जागेवर आहे का?"
या विधानावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या?
भारतीय समाजात लैंगिक विषयांवर चर्चा टाळली जाते, त्यामुळे अनेकांनी गौतमीच्या विधानावर संताप व्यक्त केला, तर काहींनी तिच्या खुलेपणाचे कौतुक केले.