Marathi News> मनोरंजन
Advertisement

'...तर नवऱ्यालाच सोडेन', Gautami Patil चं लग्नाआधीच मोठं वक्तव्य

Gautami Patil : गौतमी पाटीलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. गौतमी जे काही करते ते सगळं आईसाठी करते. लग्नानंतर तिचं कसं होईल तिची कोण काळजी घेईल असा विचार तिला येतो. इतकंच काय तर पुढे गौतमीनं नवऱ्याला सोडण्याचे कारणही सांगितले आहे. 

'...तर नवऱ्यालाच सोडेन', Gautami Patil चं लग्नाआधीच मोठं वक्तव्य

Gautami Patil : लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही नेहमीच तिच्या शोमुळे चर्चेत असते. कधी तिच्या शोला असलेली गर्दी चर्चेचं कारण ठरते तर कधी तिचा डान्स. गौतमी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गौतमी तिच्या लग्ना विषयी एका मुलाखतीत बोलली होती. तेव्हापासून तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. तर आता गौतमीनं तिची आई तिच्यासाठी खूप महत्त्वाची असून तिच्यासाठीच सगळं काही करत असल्याचं सांगत. जर वेळ आली तर नवऱ्याला सोडेन असं म्हटलं आहे. 

गौतमीनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे. या मुलाखतीत गौतमीनं तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केलं आहे. गौतमी यावेळी म्हणाली की 'मी आईसाठी काम करते. माझं लग्न झाल्यानंतर तिचं काय होईल. ती कुठे जाणार, तिला कोण सांभाळणार, असे अनेक विचार मला येतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला सोडून तर मी जाणार नाही आणि समजा अशी वेळ आली तर मी नवऱ्याला सोडेन.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गौतमी पाटीलसाठी तिची आईच्या खूप महत्वाची आहे जशी प्रत्येक मुलीसाठी तिची आई असते. खरंतर गौतमीसाठी तिची आईच हे तिचं विश्व आहे. त्यामुळे आईला सोडून ती कुठे जाणार नाही असं तिनं सांगितलं. 

हेही वाचा : Satish Kaushik Birth Anniversary : काय नियती म्हणावी, वयाच्या 56 व्या वर्षी वडील झालेले सतीश कौशिक हे सुखही फार काळ अनुभवू शकले नाहीत...

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर काही दिवसांपूर्वी लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डेनं वक्तव्य केलं होतं. प्रिया बेर्डे या म्हणाल्या होत्या की या सर्व गोष्टीला बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे जो पर्यंत हे शो बंद करत नाहीत, तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत. आम्ही आणि राज्यकर्ते यांनी कितीही ओरडून आणि निषेध करून काही होणार नाही' 

त्यावर गौतमीनं आता उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत गौतमीनं प्रिया बेर्डे यांच्या या वक्तव्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. गौतमीला या मुलाखतीत प्रिया बेर्डे यांच्या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न विचारला असता म्हणालीस, 'मी वाईट काय करतेय हे त्यांनी दाखवावे.' 

दरम्यान, गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर नुकतेच तिचे 'तेरा पता हे' गाणं प्रदर्शित झालं आहे. गौतमीच्या या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तर लवकरच गौतमी 'घुंगरू' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. तर गौतमीचे चाहते तिच्या या आगामी चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. 

Read More