Marathi News> मनोरंजन
Advertisement

मी येतीये! Gautami Patil च्या पोस्टची एकच चर्चा, बैलाच्या वाढदिवशी होणार कल्ला

Gautami Patil च्या या नव्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. गौतमी पाटीलच्या पिंपरी चिंचवड कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांनी गर्दी केली होती. गौतमीच्या कार्यक्रमासाठी लाखोंच्या गर्दीनं लोक जमा होतात. या आधी देखील अनेकांनी बैलाचा वाढदिवस असा जोरात केला होता. 

मी येतीये! Gautami Patil च्या पोस्टची एकच चर्चा, बैलाच्या वाढदिवशी होणार कल्ला

Gautami Patil Show : 'सबसे कातील गौतमी पाटील' अशी ओळख निर्माण करणाऱ्या गौतमी पाटीलचे (Gautami Patil) लाखो चाहते आहेत. गौतमीला वेगवेगळ्या कार्यक्रमात डान्स पर्फॉर्मन्स करण्यासाठी बोलावण्यात येते. तिच्या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येनं लोक गर्दी करतात. काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड येथे गौतमीचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त होती असे म्हटले जाते. त्यामुळे हा एक वेगळा चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आता वेगळ्या गोष्टीसाठी गौतमी चर्चेत आली आहे. ते म्हणजे आता गौतमीला चक्क एका बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या मालकानं कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यासाठी खास गौतमीला आमंत्रण देण्यात आले आहे. 

गौतमीनं स्वत: याचा खुलासा केल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रचा चॅंपियन असलेल्या अश्विन बैलाचा वाढदिवस जंगी करण्याचं या बैलाच्या मालकानं ठरवलं. बैलाचा वाढदिवस करायचा म्हणून फक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही तर त्यासोबत गौतमीला देखील बोलावण्यात आले. गौतमीनं या व्हिडीओत सांगितले की जावळी तालुक्यातील खर्शी कुडाळ 11 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता तिचा कार्यक्रम असणार आहे. हा कार्यक्रम असण्याचं कारण देखील तिनं सांगितलं आहे. महाराष्ट्र चॅंपियन अश्विन बैलाच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध गाडा मालक पै. सतिश भोसले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येणार आहे. मी येतेय, तुम्हीही नक्की या.. असं आवाहन देखील गौतमीने तिच्या चाहत्यांना केलंय. गौतमी लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे.  'बिग बॉस'मराठी फेम उत्कर्ष शिंदेसोबत गौतमी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वत: उत्कर्षनं याची माहिती दिली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Priyanka Chopra च्या घरी पोहोचला राम चरण, ऑस्कर पार्टीतील फोटो Viral

दरम्यान, बैलाचा वाढदिवस साजरा करण्याची ही पहिली वेळ नाही, तर या आधी देखील डोंबिवलीतील मोठा गावातील किरण म्हात्रे यांनी आपल्या बैलाचा म्हणजेच शहेनशहाचा वाढदिवस केक कापून मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला होता. इतकेच नाही तर शहेनशहाच्या वाढदिवसानिमित्त म्हात्रे यांनी ऑर्केस्ट्रा सह जंगी पार्टीचे आयोजन केले होते. बर्थडे निमित्त शहेनशाहला देखील सजवण्यात आलं होतं. शेकडो ग्रामस्थ आपल्या लाडक्या शहेनशहाच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. कुटुंबीयांनी शहेनशहाला केक भरवूनन आनंद साजरा केला. त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती. शहेनशाच्या वाढदिवसाच्या जल्लोषाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Read More