Bollywood Actress: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी काम केलं आहे. आतापर्यंत शाहरुख खानने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला शाहरुख खानच्या एका चित्रपटातील नायिकेबद्दल सांगणार आहोत. जिने शाहरुख खानसोबत पहिल्याच चित्रपटात अभिनय करून सर्वांना भुरळ घातली. या चित्रपटाने नाव 'स्वदेस' आहे.
शाहरुख खानच्या 'स्वदेस' या चित्रपटातून गायत्री जोशी हिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. गायत्री ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. मात्र, तिला कधीच वाटले नव्हते की तिचा हा आपला शेवटचा चित्रपट असेल. या चित्रपटात काम करून तिने अभिनय क्षेत्र सोडले.
गायत्री जोशी लग्नानंतर इंडस्ट्रीपासून लांब
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करून पहिलाच हिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेत्रीने अभिनय क्षेत्र सोडले आणि एका उद्योगपतीशी लग्न केलं. मात्र, गायत्री जोशीने इंडस्ट्री का सोडली याचे कारण उद्याप समोर आलेले नाही. परंतु, तिने लग्न झाल्यानंतर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री गायत्रीने उद्योजक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केलं. रिपोर्टनुसार, विकास ओबेरॉय आणि गायत्री जोशी या दोघांची एकूण संपत्ती ही सुमारे 45,000 हजार कोटी रुपये इतकी आहे.
अभिनेत्री गायत्री जोशीचा 'स्वदेस' हा चित्रपट 2004 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत काम केलं. या चित्रपटानंतर तिने कोणताही चित्रपट केला नाही. त्यानंतर अभिनेत्रीने 2005 मध्ये ऑगस्ट महिन्यात रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज विकास ओबेरॉय यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर तिने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.
400 कोटींचे आलिशान घर
विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रिअल्टीचे प्रमुख आहेत. त्यांचे मुंबईत आलिशान घरे, हॉटेल्स आणि मोठे प्रकल्प देखील आहेत. विकास ओबेरॉय यांच्याकडे वैमानिक परवाना असून त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल मुंबई येथून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी गायत्री जोशी यांच्यासोबत लग्न केलं. आता दोघेही वरळीतील 360 वेस्ट येथे असणार्या 400 कोटींच्या आलिशान घरात राहतात.