Marathi News> मनोरंजन
Advertisement

कोरियोग्राफर गीता कपूरनं सोडलं बॉलिवूड; म्हणाली, 'कमबॅक करणार नाही कारण...'

Geeta Kapoor Quits Bollywood : गीता कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड सोडलं असून कमबॅक करणार नाही याविषयी सांगितलं आहे. 

कोरियोग्राफर गीता कपूरनं सोडलं बॉलिवूड; म्हणाली, 'कमबॅक करणार नाही कारण...'

Geeta Kapoor Quits Bollywood : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री गीता कपूरनं आजवर अनेक गाजलेल्या गाण्यांची कोरियोग्राफी केली आहे. गीता कपूरनं बॉलिवूड सोडल्याची घोषणा केली आहे. गीतानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही घोषणा केली आहे. तिनं गीतानं एक असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. तिनं फराह खानला 'कुछ कुछ होता है' आणि 'दिल तो पागल है' गेल्या अनेक वर्षांपासून ती डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून दिसली. गीता कपूरनं सांगितलं की तिची बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची काही इच्छा नाही.

गीता कपूरनं 'हिंदी रश' ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत गीता कपूरला विचारण्यात आलं की बॉलिवूडमध्ये तू कमबॅक कधी करणार आहेस? आता खूप मोठा काळ उलटून गेलो. आता परत ये. त्यावर उत्तर देत गीता म्हणाली, 'नाही, मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीनं एक पाऊल मागे जायला हवं आणि नव्या टॅलेन्टला पुढे येण्याची संधी द्यायला हवी.'

का सोडलं बॉलिवूड?

गीता कपूरनं पुढे सांगितलं की 'आता दुसऱ्यांनी आयुष्यात पुढे जाण्याची आणि काही तरी करून दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्याला जितकं या इंडस्ट्रीला द्यायचं होतं, जितकं काम, जितके पैसे आणि लोकप्रियता कमवायची होती. पण जर असं काही झालं, जिथे माझा इंट्रेस्ट हा एकदम पीकवर असेल आणि मला वाटेल की काहीही झालं तरी मी ही संधी सोडायला नको, तर तेव्हा मी ते करेन.'

'इंडस्ट्रीमध्ये कामाची कमी...'

गीता कपूरनं सांगितलं की 'त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये काम कमी आहे आणि अशात इतर लोकांना संधी द्यायला हवी. तर त्यावर बोलताना गीता म्हणाली, सध्या पाहायला गेलं तर कामाची कमतरता आहे. काम मिळत नाही. आमच्यावेळी जसे चित्रपट बनायचे, तसे आजकाल बनवले जात नाही. आमच्यावेळी चित्रपटांमध्ये 8-10 गाणी असायची आणि मोठी देखील असायची. डान्सिंग गाणी होते. मग अशात आता कमी काम असताना आम्ही पण ते करण्यासाठी धावपळ करायची, दुसऱ्याला संधी द्यायचीच नाही... त्यामुळे त्यांना करू द्या. मी जिथे आहे तिथे आनंदी आहे.'

गीता कपूरनं पुढे सांगितलं की 'तिला कोणत्याही बंधनात काम करायचे नाही. तिला कॉपी-पेस्ट नाही तर सर्जनशील काम करायचे आहे. गीता कपूरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने वयाच्या 17 व्या वर्षी सुरुवात केली. त्यानंतर ती फराह खानच्या ग्रुपमध्ये सामील झाली.'

हेही वाचा : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम कपलनं झालं विभक्त; पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, 'मी त्याची...'

गीताविषयी बोलायचं झालं तर फराह खाननं अनेक चित्रपटांमध्ये असिस्टंट म्हणून काम केलं आहे. त्यात 'कुछ कुछ होता है' आणि 'दिल तो पागल है' शिवाय 'कभी खुशी कभी गम', 'मोहब्बतें', 'कल हो ना हो', 'मैं हूं ना' आणि 'ओम शांति ओम' गाणी आहेत. गीता कपूर, फराहला आईचं स्थान दिलं आणि त्याविषयी गुरु देखील मानते. 

Read More