Marathi News> मनोरंजन
Advertisement

वयाने छोट्या असलेल्या या अभिनेत्यासोबत लग्न करणार गीता माँ? फोटोंमुळे चर्चेंना उधाण

बॉलीवूडधील कोणती व्यक्ती कधी काय करेल आणि कोणती बातमी आपल्यासमोर येईल याचा काही नेम नाही.

वयाने छोट्या असलेल्या या अभिनेत्यासोबत लग्न करणार गीता माँ? फोटोंमुळे चर्चेंना उधाण

मुंबई : बॉलीवूडधील कोणती व्यक्ती कधी काय करेल आणि कोणती बातमी आपल्यासमोर येईल याचा काही नेम नाही. आम्ही असे म्हणत आहोत कारण आता बॉलिवूड जगतातून एक अशी बातमी समोर येत आहे जी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. बऱ्याच दिवसांपासून सिंगल असलेली गीता माँ म्हणजेच गीता कपूरच्या बॉयफ्रेंडची आता चर्चा होत आहे. व्यवसायाने गीता कपूर कोरिओग्राफर आहे. ती बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना डान्स शिकवते.

इतकंच नाही तर ती अनेक टीव्ही रिऍलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसत आहे. गीता माँने वयाची 40 ओलांडली आहे आणि आता तिच्या प्रियकराची चर्चा होत आहे. गीता कपूर आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत.  इतकंच नाही तर दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत पण दोघांनीही आजपर्यंत एकमेकांचे प्रेम स्वीकारलेले नाही.

fallbacks

कदाचित गीता कपूरला या विषयावर कोणाला काही सांगायचे नसेल? पण दोघंही एकमेकांच्या प्रेमात हरवल्याचं फोटोंमधून स्पष्ट होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, राजीव हा व्यवसायाने सहाय्यक दिग्दर्शक आहे आणि त्यांने काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

गीता कपूरने अनेक मोठ्या चित्रपटांसाठी कोरिओग्राफी केली असून, पहिल्यांदाच तिचे नाव एखाद्या व्यक्तीसोबत घेतले जात आहे. गीता माँ कोणाशीही रिलेशनशिप शेअर करत नसल्याची चर्चा टीव्हीवर असली तरी या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. इतकंच नाही तर गीता माँने आजपर्यंत लोकांना सांगितलं आहे की, तिला कोणाशीही रिलेशनशिपमध्ये यायचं नाही कारण हे काम खूप अवघड आहे.

fallbacks

गीता कपूरने वयाच्या १५ व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये डान्स करायला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत तिने सरोज खान आणि फराह खान यांना आपला गुरू बनवले आहे.

अशोका, तेरे नाल लव हो गया, हे बेबी, तीस मार खान, दिल तो पागल है, मोहब्बतें, कभी खुशी कभी गम यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये गीता कपूरने मोठे योगदान दिले आहे.

Read More