Marathi News> मनोरंजन
Advertisement

चालू रीलमध्ये जिनिलियानं रितेशला मारलं!

Genelia Riteish Deshmukh : जिनिलियानं चालू रीलमध्ये रितेशला मारलं! व्हिडीओ शेअर करत म्हणाली 'आपण...'

चालू रीलमध्ये जिनिलियानं रितेशला मारलं!

Genelia Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. रितेशन आणि जिनिलिया हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. रितेश आणि जिनिलिया यांचे रिल्स तर चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल होतात. सध्या त्यांचं एक रील सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या रीलमध्ये जिनिलियानं रितेशला मारलं असून त्याविषयी सांगत तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

जिनिलिया आणि रितेशनं हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत जिनिलियानं ग्रे रंगाचं स्वेटशर्ट आणि नेव्ही ब्लू रंगाची ट्रॅक परिधान केली आहे. तर रितेशनं पिवळ्या रंगाचं टी-शर्ट आणि शॉर्ट्स परिधान केली आहे. या व्हिडीओत बॅकग्राऊंडला एक व्यक्ती बोलताना दिसते की थोडं जवळ या आणि जिनिलिया लगेच रितेशला तिच्या जवळ खेचते. त्यानंतर तो म्हणतो स्माईल करा... जिनिलिया आणि रितेश स्माईल करतात. त्यानंतर तो म्हणतो की खांद्यावर हात ठेवा. तेव्हा रितेश स्वत:च्या खांद्यावर हात ठेवतो. तर जिनिलिया त्याच्या खांद्यावर हात ठेवते. रितेशनं केलेलं हे कृत्य पाहता जिनिलिया रागात त्याच्या पोटात मारते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ शेअर करत जिनिलियानं कॅप्शन दिलं की 'माझा प्रिय नवरा, खऱ्या आयुष्यातले आपण असेच आहोत. 
मी - सतत तुझ्याकडून काहीतरी मागत असते.
तू - जे सांगितलं त्याच्या विरुद्ध करतोस. 
मी - निराश झालेले
तू- काय चुकलं हे तुला माहितच नसतं... हा हा हा... मात्र, हेच प्रेम आहे असं मला वाटतं. नेहमीसोबत राहणं, काहीतरी वेगळं करत राहणं, नेहमी प्रयत्न करत राहणं, हार न माननं आणि नेहमी एकदुसऱ्यांच्यासोबत राहणं. खूप खूप प्रेम रितेश. तू कायमसाठी माझ्यासोबत अडकला आहेस. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.' 

जिनिलियानं शेअर केलेली ही पोस्ट काल त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं होती. तर जिनिलियानं शेअर केलेल्या त्या पोस्टवर रितेशनं कमेंट करत सांगितलं की तो पंच खरा होता. पण तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे बायको.' 

Read More