Kajol Vs Genelia Net Worth: बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय अभिनेत्री काजोल आणि जिनिलीया डिसूजा या दोघीही आपल्या अभिनय कौशल्यामुळे ओळखल्या जातात. या दोघींचा जन्म 5 ऑगस्ट रोजी झाला असून आज त्या आपला वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने जाणून घेऊया की काजोल आणि जिनिलीया यांपैकी कोणती अभिनेत्री आहे सर्वात जास्त श्रीमंत.
TV18 च्या अहवालानुसार काजोलची एकूण नेटवर्थ सुमारे 240 कोटी रुपये इतकी आहे. काजोल फक्त चित्रपटांतूनच नव्हे तर सोशल मीडिया पोस्ट्स, ब्रँड एंडोर्समेंट्सद्वारे देखील मोठ्या प्रमाणात कमाई करते. काजोल आपल्या पती अजय देवगन आणि मुलांसोबत शिवशक्ती नावाच्या आलिशान बंगल्यात राहते. या बंगल्याची किंमत सुमारे 60 कोटी रुपये आहे.
तिच्या मालकीचा मुंबईच्या पवईमध्ये एका इमारतीत फ्लॅट देखील आहे. 2022 मध्ये तिने जुहूमध्ये 12 कोटी रुपये किंमतीचे दोन अपार्टमेंट्स खरेदी केले होते. तिच्याकडे 7.64 कोटी रुपये किंमतीचे एक ऑफिस स्पेस सुद्धा आहे. तसेच काजोलकडे BMW X7, Volvo XC90 आणि Audi Q7 कार आहेत.
काजोलने अभिनेता अजय देवगणसोबत विवाह केला आहे. तिला दोन मुले आहेत. मुलीचे नाव निसा आणि मुलाचे नाव युग आहे. काजोल तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समाधानी आहे.
DNA इंडियाच्या अहवालानुसार जिनिलीया डिसूजाची एकूण संपत्ती 140 कोटी रुपये इतकी आहे. ती चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते. ती अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे प्रतिनिधित्व करते. जिनिलीया ही दरमहा सुमारे 1 कोटी रुपये कमावते. ती एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये फी घेते. तिच्याकडे BMW सारख्या लक्झरी कार आहेत. जिनिलीयाने अभिनेता रितेश देशमुख याच्यासोबत लग्न केलं आहे. त्यांना दोन मुले आहेत. तिचे वैवाहिक आयुष्य आनंदात सुरू आहे.
काजोल आणि जिनिलीयाचा जन्मदिवस जरी एकाच दिवशी असला तरी संपत्तीच्या बाबतीत काजोल आघाडीवर आहे. काजोलची संपत्ती 240 कोटी रुपये तर जिनिलीयाची 140 कोटी रुपये आहे. दोघींच्याही कारकीर्दीत मोठा यशस्वी प्रवास दिसतो. मात्र सध्या काजोल हिच्याकडे आर्थिकदृष्ट्या जास्त आहे.