Marathi News> मनोरंजन
Advertisement

Video: दीपिकाहून झपाट्याने शेअर होतोय 'या' चिमुकलीच्या 'घुमर'चा अंदाज

  वादविवादांचा अडथळा पार करून 'पद्मावत' हा सिनेमा अखेर रसिकांच्या भेटीला आला आहे.

Video: दीपिकाहून झपाट्याने शेअर होतोय 'या' चिमुकलीच्या 'घुमर'चा अंदाज

मुंबई  :  वादविवादांचा अडथळा पार करून 'पद्मावत' हा सिनेमा अखेर रसिकांच्या भेटीला आला आहे.

लॉन्ग विकेंडचा फायदा उचलत,विरोधकांच्या धमक्या झुगारून प्रेक्षकांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. चार दिवसांमध्ये 'पद्मावत'ने 100 कोटींचा पल्ला पार केला आहे. 

घुमरची क्रेझ 

'पद्मावत' चित्रपटातील अनेक दृश्यांवर समाजातील काही घटकांनी निषेध नोंदवला होता. त्यापैकी एक म्हणजे 'घुमर' गाणं. घुमर हे पद्मावतमधील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं.त्यामधील दीपिकाचा रॉयल अंदाज आबालवृद्धांवर भुरळ घालणारा ठरला. प्रदर्शनावेळेस या चित्रपटातील गाण्यात दीपिकची कंबर तंत्रज्ञानाच्या मदतीने झाकून पुन्हा नवं गाणं प्रदर्शित करण्यात आले.  'या' मुलांचे घुमर नृत्य पाहिले का ?

चिमुकलीचा खास अंदाज  

राजस्थानी पारंपारिक नृत्य 'घुमर' करताना दीपिकाने चाहत्यांची मनं जिंकली. दीपिकाच्या चाहत्यांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश होता. साडी नेसून 'घुमर' करताना तिचा अंदाज लाजबाब होता.  
चिमुकलीच्या 'घुमर' नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर होत आहे.

 

 

दीपिकाचे खास ट्विट  

 

दीपिकाने चिमुकलीच्या प्रयत्नाचे कौतुक करताना ट्विटरवरून तिला शुभेच्छा देताना अभिनंदनही केले. 

Read More