Marathi News> मनोरंजन
Advertisement

रॅपर बादशाहच्या Buzz वर या मुलींनी केला धमाकेदार डान्स...

रॅपर बादशाहचा सध्या बॉलिवूडमध्ये बोलबाला आहे. 

रॅपर बादशाहच्या Buzz वर या मुलींनी केला धमाकेदार डान्स...

मुंबई : रॅपर बादशाहचा सध्या बॉलिवूडमध्ये बोलबाला आहे. अलिकडेच गायिका आस्था गिलसोबत सिंगल बज्झ प्रदर्शित झाला आहे. बादशाहचा रॅप आणि आस्थाचा मखमली आवाजाने नटलेल्या या गाण्याची सध्या म्युझिक चार्टबीटवर जादू पसरलेली आहे. या गाण्यात बिग बॉस सीजन ११ मधील प्रियांक शर्मा देखील आहे. पण या गाण्यावर या मुलींनी जबरदस्त डान्स केला आहे. हा डान्स इतका सुंदर आहे की गायिका आस्था गिलनेही हा डान्स व्हिडिओ आपल्या इंस्‍टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

बज्झमध्ये प्रियांक शर्मा आणि सिंगर आस्था गिल थिरकताना दिसत आहेत. मुंबईतील डान्सर सोनाली भदौरियाने हा व्हिडिओ आपल्या इंस्‍टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. सोनाली कोरिओग्राफर असून अनेकदा ती तिचे डान्स व्हिडिओज शेअर करत असते. या व्हिडिओत त्यांच्यासोबत देवराज आणि सारंग राय दिसत आहेत. हा पहा व्हिडिओ...

 

 

A post shared by Aastha Gill (@aasthagill) on

बज्झ शिवाय बादशाहचे तारीफां गाण्याचीही चर्चा आहे. हे गाणे बहुचर्चित सिनेमा वीरे दी वेडींगमध्ये दिसेल. 

Read More