Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIRAL VIDEO: 'या' तरुणींनी केला धमाल डान्स, व्हिडिओचा सोशल मीडियात धुमाकूळ

'तु अखियाँ मिलाके' या पंजाबी गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे.

VIRAL VIDEO: 'या' तरुणींनी केला धमाल डान्स, व्हिडिओचा सोशल मीडियात धुमाकूळ

नवी दिल्ली : 'तु अखियाँ मिलाके' या पंजाबी गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. इतकचं नाही तर या गाण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की अनेकजण या गाण्यावर डान्स करुन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करत आहेत.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

व्हायरल होतोय व्हिडिओ 

सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ LiveToDance with Sonali नावाच्या एका युट्यूब चॅनलने अपलोड केला आहे. या व्हिडिओत २ तरुणींनी जबरदस्त डान्स केल्याचं पहायला मिळत आहे.

दोन दिवसांत लाखोंनी पाहिला व्हिडिओ

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून केवळ दोन दिवसांतच हा व्हिडिओ २ लाखांहून अधिकवेळा पाहिला आहे. तसेच अनेकांच्या प्रतिक्रियाही मिळत आहेत. हा व्हिडिओ १३ जानेवारी २०१८ रोजी अपलोड केला होता. 

व्हिडिओचा सोशल मीडियात धुमाकूळ

या व्हिडिओत दोन तरुणी डान्स करत असून त्यांची नावं सोनाली आणि रुतुजा असल्याचं म्हटलं आहे. या २.२८ मिनिटांच्या व्हिडिओत दोघींनी उत्तम डान्स केला आहे. 'तु अखियाँ मिलाके' हे गाणं त्यांनी एका वेगळ्याच अंदाजात सादर केलं आहे. त्यामुळेच या व्हिडिओला मोठा प्रतिसादही मिळत आहे.

VIRAL VIDEO: 'या' तरुणींनी केला धमाल डान्स, व्हिडिओचा सोशल मीडियात धुमाकूळ

Read More