Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऑनलाईन रिलीज झाला 'गॉड, सेक्स अॅण्ड ट्रथ' हा सिनेमा

सिनेमा दिग्दर्शक रामगोपाल वर्माचा गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ हा सिनेमा ऑनलाईन रिलिज 

ऑनलाईन रिलीज झाला 'गॉड, सेक्स अॅण्ड ट्रथ' हा सिनेमा

मुंबई : सिनेमा दिग्दर्शक रामगोपाल वर्माचा गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ हा सिनेमा ऑनलाईन रिलिज 

हा सिनेमा अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवावर आधारित आहे. हा सिनेमा रिलिज झाल्यानंतर रामागोपाल वर्माने अनेक ट्विट्स केले. यातील रामूचं हे ट्विट सर्वांना आकर्षित केलं आहे. 

ट्विट करून दिला सल्ला 

ट्विट करताना रामगोपाल वर्मा म्हणाले की, गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ या सिनेमाला चांगल्या स्पिकरच्या हेडफोनसोबत पाहा. यामध्ये एमएम किरावनीचे म्युझिक असून या सिनेमाला मिया मालकोवा प्रमाणे सुंदरता प्राप्त झाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून या सिनेमावरून अनेक वाद सुरू आहेत. न्यूज एजन्सी आयएएनएसनुसार, गुरूवारीच हैदराबाद पोलिसांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून अश्लिलता पसरवत असल्याचा आरोप केला आहे. हा चित्रपट खूपच अश्लील असल्याचा ठपका ठेवत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लीलतेचा प्रसार केल्याप्रकरणी, राम गोपाल वर्माविरोधात आयटी अ‍ॅक्ट 2000 च्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या देवी आणि त्यांच्या सहकाºयांनी याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सेंट्रल क्राइम स्टेशनमध्ये आरजीव्हीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, राम गोपाल वर्माने या चित्रपटासंबंधी सोशल मीडियावर बरेचसे फोटो शेअर केले. मात्र यातील एक फोटो अश्लील असून, त्याचा समाजमनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्या तक्रारीत उपस्थित केला.

त्यामुळे अक्षय कुमारने आपल्या पॅडमॅन या सिनेमाची रिलीज डेट मागे घेतली असली तरीही पद्मावत सोबत रामूचा हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे लाँग विकेंडला चाहत्यांनी 2 सिनेमा पाहता येणार आहे.

Read More