Ranya Rao: सोन्याची तस्करीकेल्याप्रकरणी कन्नड अभिनेत्री रान्या रावचे वडील डीजीपी रामचंद्र राव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. डीजीपी रामचंद्र राव यांच्यावरही कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहेत. आयपीएस अधिकारी असलेले राव हे सध्या कर्नाटक स्टेट पोलीस हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. दरम्यान राव यांच्या रजेचा आदेश जारी करण्यात आला. ज्यामध्ये कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही.
रान्या रावने शनिवारी सत्र न्यायालयात दुसरी जामीन याचिका दाखल केली आहे. याआधी पहिल्या शुक्रवारी मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांची जामीन याचिका फेटाळली होती. रान्याने वकिलांमार्फत कोर्टात दिलासा देण्याची मागणी करतानाची याचिका दाखल केली आहे. आता सत्र न्यायालयात सोमवारी याविषयी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
कन्नड अभिनेत्री रान्या रावने डीआरआय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. रान्याने आरोप केले होते की, 'चौकशीदरम्यान अनेकदा तिला मारहाण करण्यात आली. जेवणदेखील दिले नाही. इतकंच नव्हे तर, अधिकाऱ्यांनी रिकाम्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी मजबूर करण्यात आली,' असे आरोप करण्यात आले.
DRIचे अतिरिक्त महानिदेशकांना लिहिलेल्या पत्रात रान्याने स्वतःला निर्दोष म्हणत तिच्यावर खोटे आरोप केले असल्याचे म्हटलं आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची मुलगी असलेल्या रान्याला दुबई येथून येताना 3 मार्च रोजी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रान्या राव कडे 12.56 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किटे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्रीच्या निवासस्थानाची देकील तपासणी करण्यात आली होती. आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या झडतीमध्ये त्यांना 2.06 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांची रोकड आढळून आली होती. त्यानंतर डीआरआय तसेच ईडी आणि सीबीआय देखील या प्रकरणाचा तपास करत आहे.
पत्रात रान्याने दावा केला आहे की, 'विमानाच्या आतच रान्याला अटक करण्यात आल. मला स्पष्टीकरणदेखील देता आलं नाही, असं तिने म्हटलं आहे. जेव्हा मला ताब्यात घेण्यात आलं. तेव्हापासून न्यायालयात नेण्यापर्यंत मला शारीरिक त्रास देण्यात आला. ज्या अधिकाऱ्यांना मी ओळखते त्यांनी मला 1015वेळा कानशिलात लगावले. सतत मारहाण केल्यानंतरही मी त्यांनी तयार केलेल्या दस्तावेजावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.'