Marathi News> मनोरंजन
Advertisement

दुसऱ्यांदा पिता होणार कपिल शर्मा? ट्विट करून दिली माहिती

कपिलची मोठी मुलगी एक वर्षाची 

दुसऱ्यांदा पिता होणार कपिल शर्मा? ट्विट करून दिली माहिती

मुंबई : कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) कायमच आपला शो आणि व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर कपिलचे खूप चाहते आहेत. आज कपिल शर्माच्या खासगी आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट व्हायरल होत आहे. याबाबत कपिलने एक ट्विट शेअर केलं आहे. 

कपिल शर्मा दुसऱ्यांदा पिता होणार असल्याची चर्चा होत आहे. खरंतर कपिलने यासंदर्भात एक ट्विट करून माहिती दिली आहे. कपिलने ट्विटमध्ये म्हटलं आहे की,'शुभ समाचारला इंग्रजीत काय म्हटलं जातं?' या ट्विटनंतर कपिल शर्माच्या घरी गुड न्यूज असल्याची शंका वर्तवली जात आहे. 

एक युझर तर कपिल शर्माला विचारतो,'दुसऱ्या मुलाची तयारी तर नाही?' तर दुसऱ्या युझरने 'गुड न्यूज आहे का?' असं देखील विचारलं आहे. 

यातील एका ट्विटला रिट्विट करत लेखक चेतन भगतने कपिल शर्माला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. चेतन भगत म्हणतात की, 'Congratulations ला हिंदीत काय म्हणतात?' खूप खूप शुभेच्छा तुम्हाला...'

अभिनेता कपिल शर्माचं गिन्नी चतरथसोबत २०१८ साली लग्न झालं. आता त्यांना एक वर्षाची अनार्य नावाची मुलगी आहे. १० डिसेंबर २०१९ रोजी अनार्यचा जन्म झाला आहे.

Read More