Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नावर पहिल्यांदाच बोलली आथिया शेट्टी, 'के एल राहुलसोबत नव्या घरात....'

लग्न झाल्यानंतर आथिया के एल राहुलसोबत 4BHKच्या घरात शिफ्ट होणार नसल्याचे स्पष्ट

लग्नावर पहिल्यांदाच बोलली आथिया शेट्टी, 'के एल राहुलसोबत नव्या घरात....'

मुंबई : अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) चांगलीच चर्चेत आहे. आथिया भारतीय क्रिकेटपट्टू के एल राहुल (K L Rahul)ला डेट करते आहे. वर्षा अखेरीस लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. तसेच लग्नानंतर आथिया आणि के एल नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचीही बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे लग्न आणि घराच्या विषयावर बोलताना आथियाने मोठी माहिती दिली आहे. 

लग्नानंतर के एलसोबत शिफ्ट होण्यावर आथिया म्हणते... 

लग्न झाल्यानंतर आथिया के एल राहुलसोबत 4BHKच्या घरात शिफ्ट होणार नसल्याचे स्पष्ट केले. तर वडील सुनील शेट्टी आणि आईसोबत नवीन घरात राहणार असल्याचे तिने सांगितलं. आथियाने घेतलेल्या नवीन घरात फक्त आपल्या पालकांसोबतच राहणार असल्याचे तिने एका कार्यक्रमात सांगितलं. तर लग्नासंदर्भात आथियाने बोलण्यावर नकार दिला आहे. 

के एल राहुल आणि आथिया शेट्टीचं रिलेशनशिप स्टेट्स -

आथिया आणि राहुल एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले. भेटीनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकामेकांशी बोलणं सुरु झालं. कालांतराने रिलेशनशिपची सुरुवात झाली.  इंग्लंड सिरीजदरम्यान के एल राहुलने आथियाला सोबत घेऊन गेल्यानंतर त्यांच्या रिलेशनची चर्चा सुरु झाली. 

Read More