Govinda and Sunita Kissing Video : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. या सगळ्यात त्या दोघांच्या वकिलानं म्हटलं की घटस्फोटाचा अर्ज हा 6 महिन्यांपूर्वी दिला होता. या सगळ्यात आता गोविंदा आणि सुनीताचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ते दोघं मुलांच्या उपस्थितीत एकमेकांना किस करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ते दोघं किस करत असताना त्यांची मुलं ही अनकम्फर्टेबल होत असल्याचे पाहायला मिळाले.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गोविंदाच्या वाढदिवसाचा आहे. त्यानं वाढदिवसाला त्याचा मुलगा आणि नवऱ्याच्या उपस्थितीत केक कापला. सुनीतानं व्हिडीओमध्ये गोविंदासाठी आनंदानं टाळ्या देखील वाजवल्या. केक कापल्यानंतर गोविंदा आणि सुनीता एकमेकांना केक भरवताना दिसले. त्याच्या अगदी काही काळानंतर सुनीता गोविंदाला किस करते. हे पाहून त्यांच्या मुलांना अनकम्फर्टेबल झाल्याचं दिसलं. ते त्यांच्या आई-वडिलांना किस करताना पाहून काही सेकंदासाठी टाळ्या वाजवनं बंद करतात. तर काही सेकंदांनंतर ते नॉर्मल देखील होतात.
काही काळापूर्वी सुनीतानं घटस्फोटाच्या बातम्या आणि गोविंदासोबत विभक्त राहण्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी पापाराझींना सांगितलं की कोणी अशी व्यक्ती अजून आलेली नाही, जी मला आणि गोविंदाला विभक्त करू शकेल. जेव्हा त्यानं राजकारणात एन्ट्री केली, तेव्हा माझी मुलगी मोठी होत होती. पार्टीचे सगळे कार्यकर्ते घरी यायचे. आता घरात तरुण मुलगी आहे, आम्ही आहोत, आम्ही शॉर्ट्स परिधान करून घरात फिरतो. तर हे चांगलं दिसत नाही ना. त्यामुळे आम्ही घराच्या समोर ऑफिस घेतलं. या जगात असं काहीच नाही जे मला आणि गोविंदाला विभक्त करु शकतं. अशी कोणतीच व्यक्ती आहे जी आम्हाला विभक्त करुन दाखवते असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी समोर यावं.
हेही वाचा : ‘आश्रम’च्या प्रमोशनवेळी बॉबी देओलला आला होता व्हर्टिगो अटॅक; म्हणाला - 'खूप घाबरलो होतो आणि... '
सुनीता आहूजानं काही दिवसांपूर्वी हिंदी रशला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तिनं म्हटलं होतं की ती आणि गोविंदा गेल्या 12 वर्षांपासून विभक्त राहत आहे. तर दुसऱ्या मुलाखतीत तिनं सांगितलं की ती तिचा वाढदिवस एकटी दारू पिऊन साजरी करते. सुनीतानं केलेल्या या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरु होती आणि त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.