Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेता गोविंदा असं का म्हणतोय?, "पूर्वी मी पवित्र होतो. आता मी दारु पितो, सिगरेट पितो"

'बॉलिवूडमध्ये माझ्याविरूद्ध अनेक षडयंत्र रचले गेले, 'माझ्याविरूद्ध कट रचले गेले होते. असा दावाही गोविंदाने केला.

अभिनेता गोविंदा असं का म्हणतोय?,

मुंबई : अभिनेता गोविंदा सिनेसृष्टीपासून थोडा दूर आहे सध्या तो लाईमलाईटपासून देखील दूर आहे. परंतु गोविंदा आपल्या बोलण्यामुळे बर्‍याचदा चर्चेत राहतो. गोविंदा आपल्या कारकीर्दीबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्यास कधीही मागेपुढे पाहत नाही. गोविंदा आपल्या वैयक्तिक जीवनात एक अतिशय अध्यात्मिक व्यक्ती आहे.

सर्वांना हे माहित आहे की, गोविंदा देवावर खूप विश्वास ठेवतो पूजा करतो. पण गोविंदाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, आता तो पूर्णपणे बदलला आहे. पूर्वीचा गोविंदा खूप पवित्र होता, पण आताचा गोविंदा खूप कडक शिस्तीचा झाला आहे.

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत गोविंदाला विचाण्यात आलं की, तुम्ही आध्यात्मिक होताय का? त्यावर गोविंदा म्हणाला, ''नाही, मी पूर्णपणे याच्या उलट आहे. मी आता अधिक भ्रष्ट आणि कटू झालो आहे. आजकाल मी पार्टी करतो, सिगारेट पीतो आणि मद्यपानही करतो. जुना गोविंदा खूप धार्मिक होता.

पूर्वी माझा भावनिक स्वभाव बर्‍याचदा माझ्या कामाच्या मध्ये येत असे, परंतु आता मी भावनिक नाही. मला अधिक व्यावहारिक आणि व्यावसायिक मार्गाने परिस्थितीचा सामना करावा लागतो'' याच मुलाखतीत बोलताना गोविंदाने इंडस्ट्रीमध्ये त्याच्याविरूद्ध कट कसे रचले गेले हेही उघड केले.

गोविंदा म्हणाला की, गेल्या 14-15 वर्षात मी पैशांची गुंतवणूक केली आणि मला सुमारे 16 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. काही लोकांनी माझ्याशी गैरवर्तन केले.

माझी फसवणूक करणारे काही चित्रपट क्षेत्रातील होते. माझ्या चित्रपटांना थिएटर मिळाले नाही आणि माझी कारकीर्द बॉलिवूडमधल्या काही लोकांना संपवायची होती, जे घडले नाही. आता, २०२१ मध्ये मी मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे.

'बॉलिवूडमध्ये माझ्याविरूद्ध अनेक षडयंत्र रचले गेले, 'माझ्याविरूद्ध कट रचले गेले होते. असा दावाही गोविंदाने यावेळी केला. तो म्हणाले, जर नशीब तुमच्या बाजूने नसेल तर  स्वत:ची माणसं तुमच्याविरुध्द जातात. या मुलाखतीनंतर गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Read More