Govinda Viral Video : बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. पण यावेळी तो त्यानं शेअर केलेल्या कौतुकामुळे नाही तर ट्रोलिंगमुळे चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा विमानातील आहे. तिथे एका लहान मुलीच्या शेजारी तो बसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, त्याच्या वागण्यावरून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
व्हिडीओत गोविंदा त्याच्या नव्या लुकमध्ये दिसतोय. मात्र, त्या लूकनं नाही तर एका दुसऱ्याच गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तो एका फ्लाइटमध्ये असून एक व्हिडीओ शूट करत आहेत आणि हळूहळू त्या लहान मुलीच्या अधिक जवळ सरकतो. काही वेळात तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवतात. ती मुलगी यामुळे थोडी अस्वस्थ होते, समजूनही घेत नाही काय चाललंय आणि गोविंदा मात्र तिच्याकडे बघून हसतात.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, लोकांनी गोविंदाला ट्रोल करायला सुरुवात केली. अनेकांना हे वागणं अत्यंत अस्वस्थ करणारं, विचित्र आणि अयोग्य वाटलं. अजून स्पष्ट नाही की हा व्हिडीओ एखाद्या जाहिरातीतला आहे की चित्रपटाचा भाग आहे, पण लोकांनी गोविंदाच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
एका रेडिट युजरनं लिहिलं की, 'तो काय करतोय? ही लहान मुलगी कोण आहे?' दुसऱ्या नेटकऱ्यानं सांगितलं, 'त्याची बायको बरोबरच बोलते.' तिसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं की, 'हे वागणं म्हणजे विचित्र आहे.' दरम्यान, गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहूजा यांच्यातील वादाची चर्चा सध्या सुरूच आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सुनीताने घटस्फोटासाठी कागदपत्रं देखील तयार केली होती. मात्र, नक्की त्यांच्यात काय सुरु आहे हे जाणून घेणं थोडं कठीण आहे.