Gram Chikitsalay Trailer : 'पंचायत' वेब सीरिजचे निर्माते एक नवीन पटकथा घेऊन आले आहेत. या वेब सीरिजचं नाव 'ग्राम चिकित्सालय' आहे. बुधवारी या सीरिजचा मजेशीर असा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या शोमध्ये विनय पाठकपासून अमोल पाराशर सारखे कलाकार दिसत आहेत. 'ग्राम चिकित्सालय' हा एक ड्रामा आहे. याविषयी बोलायचं झालं तर शहरातील डॉक्टर प्रभातचा एक प्रवास दाखवला आहे. यावेळी तो एक दूर गावात जवळपास बंद होत असलेल्या एका प्राथमिक स्वास्थ केंद्रला पुन्हा सुरु करण्याची आव्हान स्वीकारलं.
या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या एका हुशार डॉक्टर एका गावात पोहोचला आणि त्याला तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. गावतल्या लोकांची शंका कधी औषधांची कमतरता आणि राजकारण्यांमधला गोंधळ यासोबत आपल्या सगळ्यांचं मनोरंजन. ज्या प्रकारे 'पंचायत' या वेब सीरिजनं शहरात राहणाऱ्या अभिषेकला फुलेरा गावात जाऊन आणि सचिव होऊन छोट्या मोठ्या अडचणींचा सामना केला तसंच काहीसं आता आपल्याला 'ग्राम चिकित्सालय' या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
'ग्राम चिकित्सालय' छोट्या शहरांमध्ये असलेला संघर्ष आणि त्यांची मानसांचे एकमेकांसोबत असलेले संबंध आणि त्यात कशा प्रकारे नावीण्य आणता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता ट्रेलर पाहिल्यानंतर सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे डॉक्टर प्रभातला त्यांचा पहिला रुग्ण मिळणार की नाही? तर तो या गावात नक्कीच काही बदल आणू शकणार आहे की नाही... हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.
हेही वाचा : नवरा नास्तिक असताना प्रिती झिंटा मुलांना कोणता धर्म शिकवणार? स्वत: केला खुलासा
'ग्राम चिकित्सालय' ला 'द वायरल फीवर' नं बनवलं आहे. या वेब सीरिजला दीपक कुमार मिश्रा यांनी बनवलं आहे. वैभव सुमन आणि श्रेया श्रीवास्तवनं लिहिलं आहे. या सीरिजचे दिग्दर्शन राहुल पांडे यांनी केलं आहे. तर 9 मे 2025 रोजी ही सीरिज प्राइम व्हिडीओवर भारतासह 240 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अमोल पारशर आणि विनय पाठक देखील आहेत. आकांक्षा रंजन कपूर, आनंदेश्वर द्विवेदी, आकाश मखीजा आणि गरिमा विक्रांत सिंह हे सहकलाकार देखील आहेत.