Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' गायकाने मिस्ट्री गर्लसोबत शेअर केला फोटो

फोटो शेअर करत दिली माहिती 

'या' गायकाने मिस्ट्री गर्लसोबत शेअर केला फोटो

मुंबई : फिल्ममेकर अली अब्बास जफरने नुकताच आपली गर्लफ्रेंड अलीसिया जफरसोबत विवाह केला. या पाठोपाठ आता पॉलीवुड (Punjabi Industry) गायक गुरु रंधावाने साखरपुडा केला आहे. गुरू रंधावाने सोशल मीडियावर पोस्टवरून हा अंदाज लावला जात आहे. गुरू कुणा एका मिस्ट्री गर्लसोबत लग्न करण्याचं प्लानिंग करत आहे. 

गुरु रंधावाने इंस्टाग्रामवर एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत गुरू रंधावाने मिस्ट्री गर्लचा हात धरला आहे. गुरूने इथे ब्लॅक कुर्ता-पायजमा घातला आहे. तर मिस्ट्री गर्लने ऑरेंज हेवी सूट घातला आहे. फोटो शेअर करताना गुरूने कॅप्शन दिलं आहे की,'नवीन वर्ष, नवी सुरूवात'. शेअर केलेल्या या फोटोत मिस्ट्री गर्लचा चेहरा लपवण्यात आला आहे. 

गुरू रंधावाला अनेक लोकं पसंत करतात. त्याच्या नव्या गाण्याच्या प्रतिक्षेत अनेक चाहते असतात. काही दिवसांपूर्वीच 'नाच मेरी रानी' हे गाणं खूप हिट झालं. आता गुरूच्या या नव्या पोस्टने सारेचजण एक्साइटेड झालं आहे.

 या अगोदर "टायगर जिंदा है' सारख्या सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जफरने एका खासगी कार्यक्रमात लग्न केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं लग्न जाहीर केलं. आता चाहत्यांना गुरूच्या लग्नाची उत्सुकता आहे. 

Read More