Marathi News> मनोरंजन
Advertisement

Halloween Party: अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहत्यांनी मुरडले नाक

अंकिता लोखंडेचा हा लूक पाहून अनेकांना तिला ओळखता आली नाही.

Halloween Party: अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहत्यांनी मुरडले नाक

मुंबई : दिवाळीनंतर हॅलोविन पार्टी चांगलीच चर्चेत आली आहे. दोन दिवसांपूर्वी बॉलिवूडचे स्टार किड्स पार्टीत आनंद लुटताना दिसले होते. सोमवारी टीव्ही कलाकारांच्या हॅलोविन पार्टीत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा देखील समावेश आहे.

अंकिता लोखंडे आणि विकीने त्यांच्या घरी ही हॅलोवीन पार्टी आयोजित केली होती ज्यामध्ये सर्व टीव्ही स्टार्सना आमंत्रित करण्यात आले होते, त्यामुळे अनेक टीव्ही सेलेब्स या पार्टीचा भाग बनले आणि अतिशय अनोख्या लूकमध्ये पोहोचले.

fallbacks

अंकिता लोखंडेला ज्यांनी पाहिले त्यांना तिला ओळखताच आलं नसेल. या पार्टीत ती खूप विचित्र पोशाखात पोहोचली होती. हॅलोवीन पार्टीत भुताटकीची वेषभूषा करावी लागते. पण अंकिता लोखंडेचा हा लूक चाहत्यांना आवडलेला दिसत नाहीये.

अकिंता सोबत विकी जैन देखील होतो. तो पण अशाच प्रकारे तयार झाला. आता दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या फोटोवर मजेदार कमेंट करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंकिताने प्रियकर विकी जैनसोबत लग्न केले आणि आता लवकरच ते दोघेही त्यांचा पहिला लग्नाचा वाढदिवस साजरा करताना दिसणार आहेत.

Read More