Marathi News> मनोरंजन
Advertisement

मधुबालासोबत ब्लॉकबस्टर दिलेल्या अभिनेत्यानं 300 चित्रपटांमध्ये साकारली एकच भूमिका; कधीच होऊ शकला नाही लीड

Actor Played Same Role in 300 Movies : 'या' अभिनेत्यानं 300 चित्रपटांमध्ये साकारली एकच भूमिका पण कधीही साकारला नाही लीड रोल

मधुबालासोबत ब्लॉकबस्टर दिलेल्या अभिनेत्यानं 300 चित्रपटांमध्ये साकारली एकच भूमिका; कधीच होऊ शकला नाही लीड

Actor Played Same Role in 300 Movies : अभिनयाच्या जगात आपली ओळख निर्माण करण्याचं स्वप्न तर या क्षेत्रात प्रयत्न करणारी प्रत्येक व्यक्ती पाहते. पण फार कमी लोकांना हे स्वप्न पूर्ण करता येतं. असंच एक स्वप्न पाहत, मुंबई सारख्या या मोठ्या शहरात आलेला एक अभिनेता. ज्यानं अभिनय क्षेत्रात स्वत: चं स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला पण कधीच मुख्य भूमिका साकारू शकले नाही. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतलं लोकप्रिय खलनायक हामिद अली खान. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक गाजलेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 70-80 च्या दशकात ते सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी खलनायकांपैकी एक होते. 1976 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कालीचरण’, 1973 मध्ये प्रदर्शित झालेला ‘जंजीर’ त्याच वर्षी म्हणजे 1973 मध्ये प्रदर्शित झालेला ‘यादों की बारात’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचं वेगळेपण सिद्ध झालं.

हामिद अली यांनी त्याच्या कारकिर्दीत 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी अमिताभ बच्चनसकट जवळपास सर्व मोठ्या कलाकारांसोबत पडद्यावर काम केलं. विशेष बाब म्हणजे त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये एकसारखी भूमिका म्हणजेच न्यायाधीशाची भूमिका साकारली. एकाच भूमिकेत ते इतक्या चित्रपटांमध्ये दिसले, तरीही प्रेक्षकांना त्यांचं काम कधीच कंटाळवाणं वाटलं नाही. उलट, त्यांच्या आवाजाचा रुबाब आणि अभिनयाची तीव्रता लोकांना भावली.

1940 च्या दशकात त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती आणि 1990 मध्ये देखील ते चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. त्यांचा शेवटचा चित्रपट हा ‘कुर्बान’, ‘यादों की बारात’, ‘मजबूर’, ‘शहंशाह’, ‘कालिया’, ‘आन’, ‘देवदास’, ‘मुगल-ए-आझम’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. हामिद अली यांना आयुष्यभर हीच खंत राहिली की, त्यांना कधीच लीड हिरो होण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी मधुबालासोबतही अनेक चित्रपटांत काम केलं. तरीसुद्धा, त्यांची प्रतिमा कधीही टायपकास्ट झाली नाही, म्हणजेच लोकांना त्यांचं काम नेहमीच नव्यानं वाटायचं.

हेही वाचा : 71 वर्षांच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्यानं दान केली 4000 कोटींची संपत्ती; मुलाला दिला नाही एकही रुपया

ज्यावेळी हामिद अली पडद्यावर  खलनायकाच्या रूपात दिसायचे, तेव्हा त्यांचा धगधगता आवाज आणि व्यक्तिमत्त्व पाहून थिएटरमध्ये बसलेले लोक अक्षरशः थरथर कापायचे. अशा या महान कलाकाराने एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये राहूनसुद्धा अभिनयाचं वेगळं स्थान निर्माण केलं आणि त्या काळात ती उत्तम अभिनय करणाऱ्यांपैकी एक ठरले.

Read More