Marathi News> मनोरंजन
Advertisement

17 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर हंसल मेहता यांनी वयाच्या 54 व्या वर्षी बांधली लग्नगाठ

 प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी नुकतंच वयाच्या ५४ व्या वर्षी आपल्या जोडीदाराशी लग्न केलं.

 17 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर हंसल मेहता यांनी वयाच्या 54 व्या वर्षी बांधली लग्नगाठ

मुंबई :  प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी नुकतंच वयाच्या ५४ व्या वर्षी आपल्या जोडीदाराशी लग्न केलं. बुधवारी त्यांनी सैफीनाचा हात कायमसाठी धरला. त्यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दोघंही 17 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होते. दोघांनाही दोन मुलं आहेत. तर बऱ्याच काळानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हंसल मेहता यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. हे खास फोटो शेअर करण्यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, '17 वर्षांपासून आम्ही दोघांनी आमच्या मुलांना मोठं होताना पाहिलं आहे. आम्ही आमची सगळी स्वप्नं पूर्ण केली आहेत. त्याचबरोबर आता लग्नाचं स्वप्नही पूर्ण करायचं ठरवलं. नेहमीप्रमाणे ते कोणतंही नियोजन करून झालं नाही. शेवटी, प्रेम सर्वकाही घडवून आणतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांसह बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार्सही हंसल मेहता आणि सफिना यांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. या नव्या प्रवासासाठी हुमा कुरेशी, प्रतीक गांधी, राजकुमार राव, एकता कपूर, मनोज बाजपेयी असे अनेक स्टार्स या दोघांचे अभिनंदन करताना दिसत आहेत.

Read More