Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री हंसिका मोटवानीचे प्रायव्हेट फोटो इंटरनेटवर लीक

अभिनेत्री हंसिका मोटवानीचे मोबाईलमध्ये फोटो लीक

अभिनेत्री हंसिका मोटवानीचे प्रायव्हेट फोटो इंटरनेटवर लीक

मुंबई : बॉलिवूड आणि टॉलिवूडची अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) हिचे काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. फोटो कसे लीक झाले याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. जेव्हा हंसिका न्‍यूयॉर्कमध्ये होती तेव्हाचे हे फोटो असल्याचं बोललं जातं आहे. हंसिंकाचे अनेक प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर पोस्‍ट करण्यात आले. पण काही वेळेतच ते हटवण्यात आले. फोटो व्हायरल झाल्यानंतर २४ तासांनी हंसिका मोटवानी हिने ट्विट करुन याची माहिती दिली.

अभिनेत्री हंसिका मोटवानीने म्हटलं की, ' माझा फोन आणि ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. कृपया कोणत्याही रँडम मॅसेजवर प्रतिक्रिया देऊ नका. माझी टीम या गोष्टी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.' बुधवारी हंसिका मोटवानीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याआधी अभिनेता कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन आणि अभिनेत्री एमी जॅक्‍सनचे प्रायव्हेट फोटो देखील लीक झाले होते.

अक्षरा हासनने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.ह‍ंसिका मोटवानी हिने बॉलिवूड आणि दक्षिणातील सिनेइंडस्ट्रीमध्ये चांगली पकड बनवली आहे. तिने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. यानंतर बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये तिने काम केलं. 'शाका लाका बूम बूम', 'करिश्मा का करिश्मा' आणि 'देस मे निकला होगा चांद' या सिरीअलमध्ये देखील काम केलं आहे. लवकरच ती 'महा' या तमिळ सिनेमात दिसणार आहे.

Read More