Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kartik Aaryan चं खरं नाव काय? अभिनेता गडगंज संपत्तीचा मालक

कार्तिक आर्यन नाही, याचं खरं नाव तर...; हृतिकच्या बहिणीला डेट करणारा अभिनेता गडगंज संपत्तीचा मालक  

Kartik Aaryan चं खरं नाव काय? अभिनेता गडगंज संपत्तीचा मालक

Happy Birthday Kartik Aaryan : चॉकलेट बॉय म्हणजे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असणारा अभिनेता कार्तिक आर्यन आज प्रसिद्ध अभिनेत्यांपैंकी एक आहे. आज अभिनेता 32 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहे. कायम लाईम-लाईटमध्ये राहणारा कार्तिल सोशल मीडियावर देखील चर्चेत असते. कार्तिक बद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अभिनेत्याच्या फार कमी चाहत्यांना माहिती आहे. आज कार्तिकच्या वाढदिवसाचं औचित्य साधत जाणून घेवू त्याच्याबद्दल काही खास गोष्टी... 

कार्तिक आर्यनचं खरं नाव 

अभिनेत्याचं खरं नाव (Kartik Aaryan real name) कार्तिक आर्यन नसून कार्तिक तिवारी आहे. पण सिनेविश्वात पदार्पण करण्यापूर्वी त्याने स्वतःचं नाव बदललं. आज कार्तिक आर्यन हे नाव बॉलिवूडमधील फार मोठं नाव आहे. शिवाय अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. (kartik aaryan news)

कार्तिक आर्यनची संपत्ती
करियरची सुरुवात छोट्या भूमिकेने करणारा कार्तिक आज गडगंज संपत्तीचा मालक आहे. कार्तिक एका सिनेमासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये घेतो. अभिनेत्याकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. ( kartik aaryan updates)

कार्तिकने 2017 साली BMW कार खरेदी केली होती. कार्तिककडे एक लॅम्बोर्गिनी देखील आहे. या कारची किंमत 4.5 कोटी रुपये आहे. शिवाय जाहिरातींच्या माध्यमातून देखील कोट्यवधींची कमाई करतो. 

कार्तिक आर्यनची गर्लफ्रेंड
अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेता कार्तिक आर्यनचं नाव जोडण्यात आलं आहे. पण आता चक्क अभिनेता हृतिक रोशनच्या बहिणीसोबत कार्तिक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत. (pashmina roshan-Kartik Aaryan) असंख्य मुलींच्या मनावर राज्य करणाऱ्या कार्तिकच्या मनात मात्र हृतिकची बहिण पशमीना रोशन (pashmina roshan) राज्य करते. 

fallbacks

कार्तिक आर्यन आणि पशमीनाच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगायला लागल्यापासून अभिनेत्याच्या चाहत्यांना पशमीना रोशनबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. पशमीना रोशन ही हृतिक रोशनची चुलत बहीण आहे.

 

Read More