Marathi News> मनोरंजन
Advertisement

114 कुत्रे पाळणारा हा सुपरस्टार आहे तरी कोण? संजय दत्त आणि गोविंदापेक्षा श्रीमंत, जाणून घ्या नेटवर्थ

Celebrity Birthday: या बॉलिवूड सुपरस्टारने त्याच्या दोन वेगवेगळ्या घरात 100  हून अधिक कुत्रे पाळले आहेत. तो 49 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे आणि त्याने खूप प्रसिद्धीसोबतच भरपूर संपत्तीही कमावली आहे.  

114 कुत्रे पाळणारा हा सुपरस्टार आहे तरी कोण? संजय दत्त आणि गोविंदापेक्षा श्रीमंत, जाणून घ्या नेटवर्थ

 बॉलीवूडमधील एक सुपरस्टार असा आहे, ज्याच्या दोन घरांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 114 कुत्रे आहेत. 49 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय असलेल्या या अभिनेत्याने केवळ नावच नाही, तर प्रचंड संपत्तीही मिळवली आहे. वैभवशाली जीवनशैलीत तो संजय दत्त आणि गोविंदा यांनाही मागे टाकतो.

कोण आहे हा ११४ कुत्र्यांचा मालक?

114 कुत्र्यांचा मालक असलेला अभिनेता आहे मिथुन चक्रवर्ती ( Happy Birthday Mithun Chakraborty). एकेकाळी ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाणारे मिथुन आजही त्यांच्या अनोख्या लाइफस्टाईलमुळे चर्चेत असतात. प्रचंड संपत्ती, आलिशान बंगल्यांसोबत त्यांचा कुत्र्यांवर असलेला प्रेम विशेष आहे. मिथुनने त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत आणि त्यातून खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

मड आयलंड आणि ऊटीमध्ये कुत्र्यांसाठी खास सोया 

मिथुन यांचं मुंबईच्या मड आयलंड भागात असलेलं घर जवळपास 45 कोटी रुपये किमतीचं आहे. याच घरात 76 कुत्र्यांसाठी खास जागा बनवली आहे, जिथे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. हे घर जवळपास 1.2 एकर इतक्या मोठ्या जागेत पसरलेलं आहे. याशिवाय ऊटीच्या बंगल्यात 38 कुत्रे आहेत. म्हणजेच त्यांच्या दोन्ही बंगल्यांमध्ये मिळून 114 कुत्रे आहेत. यावरून तुमच्या लक्षात आलंच हे दाखवतं की ते केवळ प्राणीप्रेमी नाही, तर त्यांच्या सुखसोयींसाठीही खास लक्ष देणारे आहेत.

मिथुन चक्रवर्तीची एकूण संपत्ती

मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये ‘मृगया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 49 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिथुन यांची एकूण संपत्ती सुमारे 400 कोटी रुपये आहे. त्यांच्या काळातील सुपरस्टार संजय दत्तची संपत्ती 295 कोटी आणि गोविंदाची संपत्ती 150 कोटी रुपये इतकी आहे. यावरून मिथुन यांचं नेटवर्थच्या यादीतील स्थान स्पष्टपणे लक्षात येतं.

बिझनेस आणि लक्झरी कार कलेक्शन

मिथुन चक्रवर्ती हे केवळ अभिनेताच नाही, तर यशस्वी उद्योजकही आहेत. ते ‘मोनार्क ग्रुप’ नावाच्या हॉटेल चेनचे मालक आहेत. त्यांच्या ऊटी, मैसूर यांसारख्या शहरांमध्ये आलिशान हॉटेल्स आहेत. कार कलेक्शनच्या बाबतीतही ते मागे नाहीत. त्यांच्या ताफ्यात मर्सिडीज बेंझ, व्होक्सवॅगन, फोर्ड एंडेवर, टोयोटा फॉर्च्युनर यांसारख्या लक्झरी गाड्या आहेत.

Read More