Marathi News> मनोरंजन
Advertisement

विरूष्काची पार्टी अटेंड करून सलमानकडे गेला धोनी

मंगळवारी रात्रीपासून सलमान खानने पनवेलच्या फार्महाऊसवर आपला वाढदिवस साजरा केला.

विरूष्काची पार्टी अटेंड करून सलमानकडे गेला धोनी

मुंबई : मंगळवारी रात्रीपासून सलमान खानने पनवेलच्या फार्महाऊसवर आपला वाढदिवस साजरा केला.

या बर्थ डे पार्टीच्या वेळी सलमान खानसोबत जोया म्हणजे कतरिना कैफ देखील दिसली. सलमानने आपल्या वाढदिवसादिवशी टायगर जिंदा है या सिनेमाच्या सक्सेस निमित्त चाहत्यांचे आभार मानले. यावेळी कतरिना,अरबाज खान, सलीम खान, अर्पिता खान शर्मा आणि  त्याचा परिवारातील सदस्य होते. यावेळी भारताचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी सलमानसोबत वाढदिवस साजरा केला. 

महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी आणि मुलगी जीवासोबत मुंबईत विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या रिसेप्शनला गेले होते. कतरिना कैफ देखील या रिसेप्शनला आपल्या बहिणीसोबत उपस्थित होते. तेव्हा या दोन्ही ठिकाणं मुंबईपासून पार काही लांब नाहीत. 

सलमान खानने 52 वा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी धोनी कतरिनासोबतच संगीता बिजलानी, यूलिया वंतूर, मौनी रॉय, डेजी शाह, सोनाक्षी सिन्हा, सुनील शेट्टी, साजिद नाडियाडवाला, अनिल कपूर, बॉबी देओल यासारखे अनेक स्टार्स पार्टिला उपस्थित होते. 

Read More